मुंबई

Mumbai : काळा घोडा येथे पहिले भूमिगत कलादालन; महापालिकेची मंजुरी

काळा घोडा येथील लायन गेटजवळ मुंबईतील पहिले भूमिगत शौचालय आणि कलादालन उभारण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे.

Swapnil S

मुंबई : दक्षिण मुंबईतील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या परिसरातील वाहतूक आणि पादचारी मार्गांवरील गर्दी कमी करून पादचाऱ्यांसाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. काळा घोडा येथील लायन गेटजवळ मुंबईतील पहिले भूमिगत शौचालय आणि कलादालन उभारण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे.

नव्या आराखड्यानुसार, सध्याच्या जमिनीवरील सर्व बांधकामे हटवून त्या ठिकाणी प्रवेशासाठी दोन लहान प्रवेशद्वारे उभारण्यात येणार आहेत. प्रवेशद्वारांमधून सरकते जिने १,६६८ चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूमिगत सुविधेकडे नेतील. भूमिगत सुविधेमध्ये ४७० चौरस मीटर क्षेत्रफळाचे कलादालन आणि व्यावसायिक जागा, ३३० चौरस मीटरचे उपाहारगृह, २५५ चौरस मीटरची महापालिका चौकी, तसेच ये-जा आणि अन्य सुविधांसाठी ५२० चौरस मीटर जागेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच महिलांसाठी ५० चौरस मीटर आणि पुरुषांसाठी ४३ चौरस मीटर क्षेत्रफळाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

सध्याचे लायन गेट येथील आकांक्षी शौचालय आणि महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या चौक्या यांमुळे पादचारी मार्गांवरील ये-जा बाधित होत आहेत.

त्रुटींची तातडीने दुरुस्ती करा!

मकरंद नार्वेकर यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणी ०.९ ते १.५ मीटर रुंदीचा पादचारी मार्ग उभारण्याचे नियोजन महापालिकेने केले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता झाली नाही.

विशेष म्हणजे, या बांधकामामुळे पालिकेच्या स्वतःच्याच ‘पादचारी प्रथम’ धोरणाचे उल्लंघन झाल्याची कबुलीही महापालिकेने राज्य सरकारला सादर केलेल्या अहवालात दिली होती. त्यामुळे या त्रुटींची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कॅफे, सरकते जिन्यासह सोयीसुविधा

वातानुकूलित भूमिगत सार्वजनिक स्वच्छतागृह, त्यासोबत कलादालन, कॅफे आणि आधुनिक सरकते जिने अशी एकात्मिक सुविधा मुंबईत प्रथमच साकारली जाणार आहे. त्यामुळे काळा घोडा परिसराचे प्रमुख पर्यटन आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून असलेले आकर्षण आणखी वाढेल. त्याचबरोबर पादचाऱ्यांच्या हक्कांना प्राधान्य देण्याच्या महापालिकेच्या भूमिकेलाही बळ मिळेल, असा विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

महाराष्ट्र कायम अव्वल राहणार; MIDC चे सीईओ दीपेंद्र कुशवाह यांचे प्रतिपादन; एआय, डेटा सेंटर आणि उत्पादनांच्या क्षेत्रात प्रचंड संधी

अंतराळातून परतलेल्या 'स्टारशिप'ला झेलले

मृत्युदंड रद्द करण्यास भारताचा विरोध; संयुक्त राष्ट्रांच्या प्रस्तावाविरोधात मतदान

जीसीसी क्षेत्रात महाराष्ट्राची आगेकूच! तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हैदराबादला मागे टाकण्याची तयारी

Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश