संग्रहित छायाचित्र 
मुंबई

Mumbai Local Train Mega Block: लोकल प्रवाशांनो लक्ष द्या...उद्या मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक...

Swapnil S

मुंबई : अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी रविवार २८ जुलै रोजी मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक घेतला आहे. मुख्य मार्गावर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ पर्यंत आणि हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा येथे डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. त्यापुढे माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यांवर थांबतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पलीकडे असलेल्या जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी १०.५० ते दुपारी ३ वाजेपर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील. त्यापुढे मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित नियोजित थांब्यावर थांबतील आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि १५ मिनिटांनी गंतव्यस्थानावर पोहोचतील. ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल चालविण्यात येतील.

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान ब्लॉक

हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.तसेच पनवेल येथून सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे येथे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील सेवा आणि ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाउन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नाही

मुंबई : रेल्वे रुळांच्या देखभाल दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामानिमित्त पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी बोरीवली आणि भायंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रात्री १२ ते पहाटे ४.३५ पर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक कालावधीत अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार/वसई रोड ते बोरीवली/गोरेगाव दरम्यान अप जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. त्यामुळे रविवारी २८ जुलै रोजी या मार्गावर ब्लॉक घेण्यात आलेला नाही.

डॉक्टर आत्महत्या प्रकरण : रणजीतसिंह निंबाळकरांवर विरोधकांचा आरोप; मात्र, मुख्यमंत्री फडणवीसांचा पाठिंबा, म्हणाले, "चिंता करू नका...

पाकिस्तानात सलमान खान 'दहशतवादी' घोषित; एका विधानाने 'भाईजान' ठरला अतिरेकी

फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी मोठी अपडेट; निलंबित PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण

झारखंड : रुग्णालयाचा निष्काळजीपणा? थॅलेसेमियाग्रस्त ५ मुलांना HIV ची लागण; दूषित रक्त चढवल्याचा धक्कादायक आरोप

Karad : खड्ड्यांमध्ये बसून यमाच्या प्रतिमेचे पूजन; रस्त्यावरील खड्ड्यांविरोधात अनोखे आंदोलन