मुंबई

Mumbai Local Train Tragedy : एकामागोमाग अनेक प्रवासी रुळांवर पडले; मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान मोठी दुर्घटना

सकाळी ९.३० च्या सुमारास सीएसएमटीहून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल आणि कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणारी फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून गेल्या त्यावेळी ही घटना घडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे नेहमीप्रमाणे अनेक प्रवासी फूटबोर्डवर लटकून प्रवास करत होते.

Krantee V. Kale

मध्य रेल्वेच्या दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी (दि.९) सकाळी धक्कादायक लोकल ट्रेन दुर्घटना घडली. कसाऱ्याहून सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकलमधून १० ते १३ प्रवासी खाली रुळांवर पडले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सकाळी ९.३० च्या सुमारास सीएसएमटीहून कसाऱ्याच्या दिशेने जाणारी फास्ट लोकल आणि सीएसएमटीकडे जाणारी फास्ट लोकल एकमेकांच्या शेजारून गेल्या त्यावेळी ही घटना घडली. लोकलमध्ये प्रचंड गर्दीमुळे नेहमीप्रमाणे अनेक प्रवासी फूटबोर्डवर लटकून प्रवास करत होते. दोन्ही ट्रेन विरूद्ध दिशेने एकमेकांच्या बाजूने जात असताना एका वळणावर लटकलेल्या प्रवाशांना घासून गेल्या आणि त्यानंतर तोल जाऊन अनेक प्रवासी रुळांवर पडल्याचे सांगितले जात आहे. या दुर्घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय अजून तीन जणांना जीव गमवावा लागल्याचं समोर आलं आहे. अन्य जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. तथापि, दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप मध्य रेल्वेकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले नाही. त्याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे.

जखमींची नावे

रेल्वे विभागाकडून चौकशी सुरू - फडणवीस

ही घटना नेमकी कशामुळे घडली, याची चौकशी रेल्वे विभागाने सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. "दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान लोकलमधून एकूण ८ प्रवासी खाली पडून झालेल्या दुर्घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींना तातडीने शिवाजी हॉस्पिटल आणि ठाणे सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिक प्रशासन समन्वय साधून आहे. जखमींना लवकर आराम मिळावा, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो", असे त्यांनी सोशल मीडियावर लिहिले.

पुष्पक एक्सप्रेसचा संबंध नाही

सुरुवातीला पुष्पक एक्सप्रेसमधून प्रवासी खाली पडल्याची माहिती आली होती. मात्र पुष्पक एक्सप्रेसचा काहीही संबंध नसल्याचे मध्य रेल्वेचे माहिती अधिकारी स्वप्नील निला यांनी स्पष्ट केले आहे.

लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी

दरम्यान, या घटनेचे अनेक फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी हळहळलेत. मुंबई ते कल्याण, मुंबई ते कसारा आणि मुंबई ते कर्जत मार्गावरील प्रवाशांना लोकलची संख्या कमी असल्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तरीही लोकलच्या फेऱ्या वाढवल्या जात नसल्यामुळे नेटकरी संताप व्यक्त करीत आहेत.

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

"कदाचित भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल"; आधी टॅरिफचा तडाखा, आता ट्रम्प यांना पाकचा पुळका; भारताला थेट डिवचलं

IND vs ENG : आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व; कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य