मुंबई

Mumbai Local प्रवाशांचे होणार हाल! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर Mega Block

Swapnil S

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, विविध अभियांत्रिकी यांच्यासह देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे.

मध्य रेल्वेने उपनगरीय विभागावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेतला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.२५ ते दुपारी २.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या कालावधीत लोकल नियोजित थांब्यांवर थांबून गंतव्यस्थानावर १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्गावर पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत सुटणारी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहील.

पश्चिम रेल्वेवर ५ तासांचा जम्बो ब्लॉक

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी बोरिवली आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सर्व अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील गाड्या गोरेगाव आणि बोरिवली स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चालविण्यात येणार आहेत. तर ब्लॉक कालावधीत काही अप आणि डाऊन उपनगरीय सेवा रद्द राहतील.

राज्यात 'महिला राज'ची चर्चा; सुप्रिया सुळे, रश्मी ठाकरे यांची नावे मुख्यमंत्रीपदासाठी चर्चेत

मुरबाडच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाचाही दावा; महाविकास आघाडीत रस्सीखेच वाढणार!

हिरे क्षेत्र गंभीर संकटात; गेल्या तीन वर्षांत आयात-निर्यातीत मोठी घट,'जीटीआरआय’चा दावा

नव्या सरकारच्या स्वागतासाठी मंत्रालयात स्वच्छता मोहीम

‘मला काहीतरी सांगायचंय’; मुख्यमंत्र्यांच्या जीवनावरील नाटक, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला