मुंबई

Mumbai : मेहंदी क्लासवरुन परतताना भरधाव कारने फरफटत नेलं; २७ वर्षीय महिलेचा दुर्देवी अंत

Swapnil S

मुंबई : वरळी हिट ऍण्ड रनची घटना ताजी असताना मंगळवारी मालाड येथे भरवेगात जाणा-या एका कारने महिलेला धडक दिली. अपघातात सहाना जावेद इक्बाल काझी या महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक रहिवाशांनी कारचालकाला पकडून बेदम मारहाण करुन कारची तोडफोड केली.

अपघाताला जबाबदार असलेल्या अनूज सिन्हा याला मालाड पोलिसांनी अटक केली असून त्याने अपघाताच्या वेळेस मद्यप्राशन केले होते का याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे.

सहाना ही पती आणि दोन मुलांसोबत मालाड येथील ऑरिस टॉवर अपार्टमेंटमध्ये राहत होती. मंगळवारी सहाना ही नेहमीप्रमाणे मेहंदी क्लाससाठी गेली होती. क्लासवरुन घरी जात असातनाच तिला भरवेगात जाणार्‍या एका कारने जोरात धडक दिली. या धडकेनंतर कारने तिला काही अंतर फरफटत नेले होते. हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात येताच त्यांनी कारचालकाचा पाठलाग करुन त्याला ताब्यात घेतले. त्याला बेदम मारहाण करुन त्याच्या कारची तोडफोड केली.

दुसरीकडे अपघाताची माहिती मिळताच मालाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या सहानाला तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मारहाणीत जखमी झालेल्या अनूजला रुग्णालयात नेण्यात आले होते. प्राथमिक औषधोपचारानंतर त्याला पोलिसांनी अटक केली. अनूज हा मर्चंट नेव्हीमध्ये कामाला असून अपघाताच्या वेळेस तो त्याच्या कारमधून घरी जात होता. भरवेगात कार चालविताना त्याचा कारवरील नियंत्रण सुटले होते. त्यामुळे त्याने सहानाला धडक देत तिला काही अंतर फरफटत नेले होते. त्यानंतर त्याने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याचा प्रयत्न स्थानिक रहिवाशांनी हाणून पाडला. त्याची मेडीकल करण्यात आली असून त्याचा रिपोर्ट अद्याप पोलिसांना प्राप्त झालेला नाही. या रिपोर्टनंतरच त्याने मद्यप्राशन केले होते का याचा खुलासा होणार आहे.

Jammu Kashmir Election : नंदनवनात आज अखेर मतदान; २४ जागांसाठी २१९ उमेदवार रिंगणात

One Nation, One Election ची अंमलबजावणी कधी? केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचे मोठे विधान

सुप्रीम कोर्टाने रोखला 'बुलडोझर न्याय'! आमच्या परवानगीशिवाय एकही पाडकाम नको; पुढील सुनावणीपर्यंत आदेश

सगेसोयरे अधिसूचनेवर सरकारनियुक्त समित्यांचे काम सुरू; कोणत्याही समाजाची फसवणूक करणार नाही - मुख्यमंत्री

विधानसभा निवडणुकीची आचार संहिता कधी लागू होणार? गिरिश महाजनांनी वर्तवले भाकीत