मुंबई

Mumbai : मालाडमधील सोसायटीत बिबट्याचा वावर

मालाड, पूर्व भागातील आयटी पार्कजवळील एका निवासी सोसायटीमध्ये मंगळवारी पहाटे बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. ‘रहेजा हाइट्स’ येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या पार्किंग परिसरात फिरताना कैद झाला असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे.

Swapnil S

मुंबई : मालाड, पूर्व भागातील आयटी पार्कजवळील एका निवासी सोसायटीमध्ये मंगळवारी पहाटे बिबट्या शिरल्याची घटना समोर आली आहे. ‘रहेजा हाइट्स’ येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा बिबट्या पार्किंग परिसरात फिरताना कैद झाला असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. पहाटे ३ ते ४ च्या सुमारास घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला असून यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

या परिसरात बिबट्या दिसण्याची ही पहिलीच वेळ नसल्याचा दावा रहिवाशांनी केला आहे. यापूर्वीही अनेकदा आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचे दर्शन झाले असल्याचे त्यांनी सांगितले. सार्वजनिक सुरक्षिततेसाठी आणि मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

बिबट्या दिसण्याचे प्रमाण वाढू लागल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्री उशिरा आणि पहाटेच्या वेळी वन्यजीवांची हालचाल अधिक असल्याने या काळात अधिक खबरदारी घ्यावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video