मराठी शाळा बंदचा डाव! मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा आरोप; निर्गमित आदेश मागे घेण्याची मागणी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मराठी शाळा बंदचा डाव! मुंबई मुख्याध्यापक संघटनेचा आरोप; निर्गमित आदेश मागे घेण्याची मागणी

दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळांसह अन्य भाषिक शाळा बंद पाडत आहे, असा आरोप मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केला आहे.

Swapnil S

मुंबई : दहावीच्या परीक्षा तोंडावर आल्या असून शिक्षण विभाग अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया राबवत आहे. यामुळे मुंबईतील मराठी माध्यमाच्या शाळांसह अन्य भाषिक शाळा बंद पाडत आहे, असा आरोप मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे उत्तर विभाग अध्यक्ष व भाजपचे प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य अनिल बोरनारे यांनी केला आहे.

राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करून शिक्षण संचालकांनी निर्गमित केलेले आदेश तातडीने मागे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. इयत्ता ९ वी व १० वीच्या वर्गामध्ये किमान २० संखेची अट संच मान्यतेत दिली आहे. मुंबईतील अनेक शाळांमध्ये २० पेक्षा कमी विद्यार्थी आहेत.

या शाळांमध्ये शून्य शिक्षक संख्या दिसत आहे. वास्तविक पाहता नववी व दहावीला प्रत्येक विषयाला शिकवायला शिक्षक दिला जात होता. त्यात विद्यार्थी संखेची अट नव्हती.

१५ मार्च २०२४ च्या संच मान्यतेच्या जी आर मध्ये नववी दहावीच्या प्रत्येक वर्गात २० विद्यार्थी असल्यास १ शिक्षक देण्याची तरतूद असल्याने राज्यातील हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.

दहावीच्या विद्यार्थ्यांना शिकवणार कोण?

शेकडो शाळांमध्ये शून्य शिक्षक दाखवले जात असून हजारो शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ५ डिसेंबरपर्यंत करण्याचे आदेश शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील शिक्षण अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यातच दहावीच्या बोर्डाची परीक्षा यंदा फेब्रुवारीमध्ये असल्याने या शाळांमधील विद्यार्थ्यांना शिकविणार कोण? त्यांच्या तोंडी व सायन्स प्रात्यक्षिक परीक्षा कोण घेणार, असा प्रश्न निर्माण होणार असून २० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांना तीन विषय शिक्षक देऊन शाळा वाचविण्याची मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.

शाळा गाठणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी दिलासा देणार; शालेय विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन; एसटी बस रद्द झाल्यास मिळणार तत्काळ मदत

ठाण्यातील मतदार यादीत घोळ; साडेचार लाख मतदार वाढले कसे? - मनसेचा आरोप; निवडणूक अधिकारी लग्नात व्यस्त

आज होणाऱ्या TET परीक्षेसाठी ४ लाख ७५ हजारांहून अधिक नोंदणी; गैरप्रकार रोखण्यासाठी CCTV सह Ai तंत्रज्ञानाचा वापर

बाणगंगा तलाव पुनरुज्जीवन दुरुस्तीच्या कामाला ब्रेक; पुरातत्त्व विभागीय कार्यालयाची कारवाई

केंद्र सरकारचा पाच बिबट्यांच्या नसबंदीला होकार; राज्य सरकारला हवी तातडीने ११५ बिबट्यांच्या नसबंदीची परवानगी