Mumbai-Mauritius Flight  
मुंबई

मुंबई- मॉरेशियस फ्लाईट रद्द; AC बंद पडला अन् प्रवाशांची प्रकृती बिघडली, Video होतोय व्हायरल

विमानातील एसी बंद पडल्याने अनेक प्रवाशांना पाच तास तसंच बसवून ठेवल्याने त्यांची तब्येत बिघडली. व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच

Naresh Shende

मुंबईहून- मॉरिशियेसला जाणारं विमानं एमके ७४९ इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द करण्यात आलं आहे. पहाटे साडेचार वाजता हे विमान मुंबईहून मॉरिशियेसला निघणार होतं. त्यामुळे पहाटे पावणे चार वाजताच प्रवासी विमानात पोहोचले. परंतु, विमानातील एसी बंद पडल्याने अनेक प्रवाशांना पाच तास तसंच बसवून ठेवल्याने त्यांची तब्येत बिघडली. या गंभीर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला आहे.

यामध्ये वृद्ध प्रवाशांचाही समावेश आहे. विमानात झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला. विमानातून बाहेर काढल्यानंतर त्यांना श्वसनाचा त्रासही झाल्याची माहिती समोर आलीय. हे विमान रद्द करण्यात आलं असून प्रवाशांसाठी दुसरी व्यवस्था करण्यात आल्याचं समजतं.

या गंभीर घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एनआयने या घटनेबाबत एक्सवर पोस्ट शेअर केली असून अशोक राज नावाच्या एक्स वापरकर्त्याने विमानातील व्हिडीओ शेअर केला आहे.

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, विमानातील एसी बंद पडल्याने प्रवाशांना सीटवर तसंच बसवून ठेवलं. पाच तास प्रवासी विमानात बसल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत