Mumbai : मेट्रो लाइन-३ वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल नेटवर्क मिळणार 
मुंबई

Mumbai : मेट्रो लाइन-३ वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईल नेटवर्क मिळणार

मुंबई मेट्रो लाइन-३ (ॲक्वा लाइन)वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच या भुयारी मार्गावर सर्वत्र अखंड मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई मेट्रो लाइन-३ (ॲक्वा लाइन)वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लवकरच या भुयारी मार्गावर सर्वत्र अखंड मोबाईल नेटवर्क कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने या मार्गासाठी प्रमुख दूरसंचार सेवा पुरवठादारांना याबाबत सुविधा उभारण्याचे अधिकार दिले आहेत. एमएमआरसी या मेट्रो लाइनच्या कामकाजाचे आणि व्यवस्थापनाचे काम पाहते.

भारती एअरटेल लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आणि व्होडाफोन आयडिया लिमिटेड यांना संयुक्तपणे या प्रकल्पासाठी संमतीपत्र देण्यात आले आहे. या अंतर्गत ॲक्वा लाइनच्या संपूर्ण मार्गावर 'इन-बिल्डिंग सोल्युशन्स' (IBS) पायाभूत सुविधांची उभारणी, संचालन आणि देखभाल केली जाणार आहे.

२५ वर्षांच्या या करारामध्ये प्रवाशांसाठी अखंड व्हॉइस आणि डेटा सेवा पुन्हा सुरू करणे, तसेच सहा महिन्यांच्या आत बीएसएनएल (BSNL) नेटवर्क सुविधा उपलब्ध करून देण्याचा समावेश आहे. सर्व टेलिकॉम सेवा पुरवठादार लवकरच भूमिगत स्थानके आणि भुयारी रेल्वेमार्गावर त्यांचे सिग्नल पोहोचवण्याचे काम सुरू करतील, अशी अपेक्षा आहे.

Mumbai Traffic Update : भांडुप-सोनापूर जंक्शनवरून रात्री प्रवास करताय? आजपासून ३१ डिसेंबरपर्यंत वाहतुकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग

FASTag New Rules : टोलनाक्यापासून २० किमी अंतरामध्ये राहता? १ नोव्हेंबरपासून १,५०० रुपयांत वर्षभराचा पास; जाणून घ्या नियम

Mumbai : जे. जे. उड्डाणपुलाखाली डबलडेकर बस धूळखात! कलादालन, कॅफेटेरिया, वाचनालय कागदावरच; महिला बचत गटांची पाठ

मुंबई, ठाणे, भिवंडीकरांनो पुढील ७ दिवस पाणी उकळून प्या; BMC चे आवाहन

Mumbai : अनधिकृत फटाके विक्रेत्यांवर बडगा! ११ नोव्हेंबरपर्यंत BMC ची विशेष मोहीम