Mumbai : मेट्रो-६ प्रकल्पाचा खर्च ४४१ कोटींनी वाढला; RTI मधून धक्कादायक माहिती झाली उघड  (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : मेट्रो-६ प्रकल्पाचा खर्च ४४१ कोटींनी वाढला; RTI मधून धक्कादायक माहिती झाली उघड

स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (ईईएच) मुंबई मेट्रो लाइन-६ प्रकल्पाचा खर्च ४४१ कोटींनी वाढला असल्याचे माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत केलेल्या मागणीमुळे उघड झाले आहे.

Swapnil S

मुंबई : स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी (ईईएच) मुंबई मेट्रो लाइन-६ प्रकल्पाचा खर्च ४४१ कोटींनी वाढला असल्याचे माहिती अधिकार (आरटीआय) अंतर्गत केलेल्या मागणीमुळे उघड झाले आहे. पाच वर्षांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही हा प्रकल्प पूर्ण झालेला नाही. दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडे (डीएमआरसी) आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती मागवली होती. गलगली यांना प्राप्त झालेल्या माहितीनुसार, प्रकल्पाची मूळ मंजूर किंमत १६८४.९५ कोटी रुपये होती. या रकमेत विविध कारणांनी वाढ होऊन हा प्रकल्प २१२६.७४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

हा मार्ग १५.३१ किमी लांबीचा उन्नत प्रकल्प आहे. मूळ विस्तृत प्रकल्प अहवालानुसार हे काम ३१ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होऊन १ एप्रिल २०२१ पासून मेट्रो सेवा सुरू होणे अपेक्षित होते. मात्र, पाच वर्षांहून अधिक कालावधी उलटल्यानंतरही प्रकल्प पूर्ण झालेला नाही.

अनेक बदल केल्यामुळे प्रकल्प खर्चात वाढ

डीएमआरसीने दिलेल्या माहितीनुसार, प्रकल्पातील विविध कॉरिडॉरचे काम वेगवेगळ्या कंत्राटदारांना देण्यात आले आहे. स्टेशन आणि सुपर स्ट्रक्चरमध्ये बदल, प्रवेश-निर्गमन रचनांतील सुधारणा, जागेची उपलब्धता, तांत्रिक गरजा तसेच व्हायाडक्टच्या डिझाइनमध्ये करण्यात आलेले बदल यामुळे प्रकल्प खर्चात वाढ झाली आहे. याशिवाय मुंबई महानगरपालिकेकडून अतिरिक्त कामांची जबाबदारीही प्रकल्पावर सोपविण्यात आली. यात जोगेश्वरी येथील मजास नाल्यावर दोन वाहन पुलांचे बांधकाम, आदर्श नगर ते जोगेश्वरी रस्त्यांची सुधारणा तसेच जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड, जंक्शन सुधारणा कामांचा समावेश आहे.

सुविधा प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आवश्यक

प्रकल्पातील वाढीव खर्च, कामातील विलंब आणि डिझाइन बदलांची संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची आपण मागणी केली असून नागरिकांच्या करातून उभारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे गलगली यांनी नमूद केले.

Maratha Reservation : मनोज जरांगेंची मोठी घोषणा; मोर्चा मुंबईत धडकणार, जाण्याचा मार्गही ठरला

लोकल चलन, ग्लोबल व्यापार! स्थानि‍क चलनात व्यापार करण्याचा तज्ज्ञांचा सल्ला

BRICS Summit 2026 : सात वर्षांनंतर शी जिनपिंग यांचे भारतात आगमन; ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठक

मुंबई, ठाणे, नवी मुंबईत ठिकठिकाणी वाहतूककोंडी; भांडुप ते तुर्भे साडेतीन तास

हक्काच्या जमिनीसाठी बालमित्र असलेल्या पंतप्रधानांकडे वृद्धाची तक्रार; २८१० चौ.मी. जमिनीचा वाद, CBI चौकशीची मागणी