प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

मुंबई मेट्रोचा नवा विक्रम : प्रवाशांचा 'इतक्या' लाखांचा टप्पा पार

मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मंगळवार ८ जुलै रोजी महा मुंबई मेट्रोने प्रवाशांचा तीन लाखांचा टप्पा पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तब्बल ३ लाख १ हजार १२७ प्रवाशांनी एका दिवसात प्रवास केला आहे.

Swapnil S

मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ मार्गाला प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. मंगळवार ८ जुलै रोजी महा मुंबई मेट्रोने प्रवाशांचा तीन लाखांचा टप्पा पार करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तब्बल ३ लाख १ हजार १२७ प्रवाशांनी एका दिवसात प्रवास केला आहे.

अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मेट्रो ७ आणि दहिसर पश्चिम ते अंधेरी पश्चिम डीएनए नगर या मेट्रो २ अ मार्ग २ एप्रिल २०२२ मध्ये प्रवाशांच्या सेवेत दाखल झाला. सुरुवातीला या मार्गावरून दिवसाला २५ ते ३० हजार प्रवासी प्रवास करत होते. गेल्या काही महिन्यांपासून या दोन्ही मेट्रो मार्गांना प्रवाशांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

दर महिन्याला प्रवाशांची संख्या सरासरी ५ टक्केनी वाढत आहे. तसेच एकूण ६२ हजार २८२ प्रवाशांनी मंगळवारी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कागदविरहित तिकिटांची निवड केली आहे. मेट्रोने ३ लाख प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. हा मैलाचा दगड म्हणजे मुंबईकरांचा मेट्रोवरील वाढता विश्वास आणि झालेली घट्ट नाळ दर्शवतो, असे महानगर आयुक्त, एमएमआरडीए आणि महा मुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.

मेट्रो स्टेशनात पाणी, कंत्राटदाराला १० लाख दंड

भुयारी मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक मेट्रो स्टेशन येथे पावसामुळे पाणी शिरल्याची गंभीर घटना घडली. या घटनेमुळे मेट्रो स्टेशनवरील प्रवासी सेवा तात्काळ थांबवावी लागली. याप्रकरणी त्वरित चौकशी करण्यात आली असून, निष्काळजीपणा आणि नियोजनात त्रुटी आढळल्याने कंत्राटदार कंपनी डोगस-सोमा जेव्ही यांना दहा लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

रेल्वे स्टेशनमध्ये दोन दिवस राहा फक्त दहा रुपयांत...आंदोलकांच्या व्हॉट्सअपवर मेसेज व्हायरल, वाशीतील एक्झिबिशन सेंटरमध्ये व्यवस्था

मराठा आंदोलकांनी केला चक्काजाम; जरांगे-पाटील यांच्या आवाहनानंतर रस्ता मोकळा