मुंबई

अंधेरीत 'म्हाडा'च्या ४ एकर जागेवर मुंबईतील पहिले 'एज्युटेन्मेंट थीम पार्क'; कामाला सुरूवात, बघा काय आहे खास?

डीएन नगर येथे म्हाडाच्या चार एकर खुल्या जागेवर हे थीम पार्क उभे राहत आहे.

Swapnil S

मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील डीएन नगर येथे चार एकर जागेवर मुंबईतील पहिले एज्युटेन्मेंट थीम पार्क लवकरच सुरू होत आहे. या थीम पार्कचे काम नुकतेच सुरू झाले असून पहिल्या टप्प्याचे काम १२ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

अंधेरी (पश्चिम) येथील डीएन नगर येथे म्हाडाच्या चार एकर खुल्या जागेवर हे थीम पार्क उभे राहत आहे. म्हाडाने ९ ऑक्टोबर रोजी या कामासाठी कार्यादेश जारी केला आहे. पहिल्या टप्प्याचे काम ऑक्टोबर २०२५ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे.  एज्युटेन्मेंट थीम पार्कच्या पहिल्या टप्प्याचा खर्च १६ कोटी ३४ लाख रुपये आहे. 

पार्कमध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी थ्रीडी शोमध्ये अंतराळ, महासागर आणि पर्यावरणाची संकल्पना साकारली जाईल. अंतराळ, महासागर आणि पर्यावरण या तीन पॅव्हिलियन्स व्यतिरिक्त, थीम पार्कमध्ये मुलांसाठी खेळ आणि मनोरंजन क्षेत्र, ॲम्फीथिएटर यांचाही समावेश आहे. 

स्थानिक आमदार अमित साटम म्हणाले की, अशा प्रकारचे थीम पार्क बनवून शहरातील अशा मोठ्या मोकळ्या जागा बिल्डर आणि जमीन बळकावणाऱ्यांनी हडप करू नयेत याचीही आम्ही काळजी घेत आहोत. तसेच याद्वारे आम्ही एक सकारात्मक पायाभूत सुविधा प्रकल्प जनतेसाठी सुरू करत आहोत. 

अंधेरी (पश्चिम) येथे ५८ उद्याने विकसित केली आहेत. जुहू बीच सुशोभीकरण प्रकल्प आणि गिल्बर्ट हिल संवर्धन प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी