Mumbai : मोडकसागर धरणाला गळती; पूर नियंत्रण दरवाजांचे दोन्ही रबर सील नादुरुस्त; दुरुस्तीसाठी पालिका करणार ९८ लाख रुपये खर्च  
मुंबई

Mumbai : मोडकसागर धरणाला गळती; पूर नियंत्रण दरवाजांचे दोन्ही रबर सील नादुरुस्त; दुरुस्तीसाठी पालिका करणार ९८ लाख रुपये खर्च

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडकसागर या धरणाच्या पूर नियंत्रण दरवाजांचे रबर सील नादुरुस्त झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे धरणातून पाणी गळती होत असून पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. आता रबर सील दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात येणार असून मुंबई महापालिका तब्बल ९८ लाख रुपये खर्च करणार आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी मोडकसागर या धरणाच्या पूर नियंत्रण दरवाजांचे रबर सील नादुरुस्त झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे धरणातून पाणी गळती होत असून पाण्याच्या पातळीत घट झाली आहे. आता रबर सील दुरुस्तीचे काम त्वरित हाती घेण्यात येणार असून मुंबई महापालिका तब्बल ९८ लाख रुपये खर्च करणार आहे. स्थायी समितीच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत या प्रस्तावावर वादळी चर्चा होण्याची शक्यता आहे.

४० टक्के पुरवठा इथूनच

मुंबईला दररोज साधारणतः ४००० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. तानसा धरण, मोडकसागर धरण, मध्य वैतरणा, उर्ध्व वैतरणा आणि भातसा धरण यातून हा पाणी पुरवठा केला जातो. त्यात मोडक सागरचा वाटा प्रतिदिन १७०० दशलक्ष लिटर एवढा आहे. उर्ध्व वैतरणा आणि मध्य वैतरणा धरणातील पाणीसाठा हा मोडक सागर धरणात सोडला जातो आणि वैतरणा पात्रातील संपूर्ण पाणी हे मोडक सागर धरणाद्वारे मुंबई शहराला पुरविले जाते.

रबर सील तातडीने बदलण्याची गरज

मोडक सागर धरणावर ८ पूर नियंत्रण दरवाजे आहेत. या ८ पूर नियंत्रण दरवाजांना विशेष प्रकारचे रबर सील दिलेले आहेत. ज्यामध्ये खालच्या बाजुला आणि एक बाजूचा सील आहे. दरवाज्यांच्या खालून कोणतीही गळती होऊ नये, यासाठी खालचा सील दरवाजा स्पिलवेवर अशा पद्धतीने ठेवला जातो. तसेच बाजूचे सील हे एम.एस. विभागांसह अशाप्रकारे क्लॅम्प केलेले आहेत जेणेकरून दरवाजे स्थिर राहतील आणि बाजूने कोणतीही गळती होऊ नये. हा स्टॉप लॉग दरवाजा किंवा स्टॉप ब्लॉक कोणत्याही दरवाजाच्या नादुरूस्तीमुळे मोठ्या गळतीच्या वेळी किंवा कोणत्याही दरवाजाच्या देखभालीच्या कामाच्या दरम्यान एक आपत्कालीन दरवाजाप्रमाणे वापरला जाऊ शकतो. या स्टॉप लॉग दरवाजाला किंवा स्टॉप ब्लॉकला देखील गळती टाळण्यासाठी खाली आणि बाजूला रबर सील दिलेले आहेत. ८ पैकी ४ स्वयंचलित पूर नियंत्रण दरवाजांचे रबर सील तातडीने बदलण्याची गरज आहे.

धरण सुरक्षितता संघटना यांनी केलेल्या धरणाच्या पर्जन्यपूर्व तपासणी व पर्जन्योत्तर तपासणीमध्ये खराब झालेले रबर सील बदलण्याचे सूचित केले आहे. त्यामुळे पूर नियंत्रण दरवाजा आणि स्टॉप लॉग दरवाजा किंवा स्टॉप ब्लॉक यांचे रबर सील बदलणे आवश्यक असून त्यानुसार आता हे रबर बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट; दोन दिवस मुंबईत मुसळधार; रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट 

Mumbai : विद्यार्थ्याचा करुण अंत; चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले

सचिन अहिर शिंदे सेनेत; ठाकरे गटाला आणखी एक हादरा; थेट 'परिषदे'च्या उपसभापतीपदाची उमेदवारी

मुंबईने नाना शंकरशेठ यांना कधीच विसरू नये

जुलै महिना कसा जाईल? बघा मेष आणि वृषभ राशीचे भविष्य