मुंबई

तुंबणाऱ्या पाण्यावर सीसीटीव्हीची नजर…पालिकेचे ५०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसाठी वाहतूक पोलीस विभागाला पत्र

पावसाळ्या दरम्यान विभागातील सर्व ठिकाणांवर मुंबई महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक पोलीस विभागाच्या अंतर्गत येत असल्याने पालिकेने वाहतूक पोलीस विभागाला गरजेच्या तसेच पाणी तुंबण्याव्या ५०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाचे पत्र पालिकेने मागील महिन्यातच वाहतूक विभागाला दिले आहे.

Swapnil S

मुंबई : पावसाळ्या दरम्यान विभागातील सर्व ठिकाणांवर मुंबई महापालिकेच्या वतीने सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाते. मात्र हे सीसीटीव्ही कॅमेरे वाहतूक पोलीस विभागाच्या अंतर्गत येत असल्याने पालिकेने वाहतूक पोलीस विभागाला गरजेच्या तसेच पाणी तुंबण्याव्या ५०० ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावाचे पत्र पालिकेने मागील महिन्यातच वाहतूक विभागाला दिले आहे. सद्यस्थितीत मुंबईवर वाहतूक पोलीस विभागाचे १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे नजर ठेवून आहेत. त्याचे थेट प्रक्षेपण पालिकेच्या आपत्कालीन विभागात केले जाते.

मुंबई क्षेत्रात कुठेही कोणतीही दुर्घटना झाली की त्याची सर्व प्रथम माहिती आपत्कालीन विभागाला मिळते. त्यांनतर जबाबदार विभागाला घटनेची संपूर्ण माहिती या विभागाकडून दिली जाते. परंतु, या विभागाला सीसीटीव्हीच्या माध्यमातून मिळणारे लाइव्ह प्रक्षेपण हे केवळ चित्रफितीच्या माध्यमातून मुंबई वाहतूक पोलीस विभागाच्या वतीने प्राप्त होते. यासाठी वाहतूक पोलीस विभागाचे १० हजारांहून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत.

परंतु, पावसाळ्यादरम्यान सखल भागातील परिस्थिती पाहता येण्यासाठी आणखी ५०० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी मुंबई महापालिकेने वाहतूक विभागाला केली आहे. यासाठीचा पत्रव्यवहार पालिकेने महिनाभरापूर्वीच केला आहे. या संदर्भात महापालिका मुख्यालयात झालेल्या बैठकीतही चर्चा झाली आहे. परंतु अद्याप वाहतूक विभागाकडून याबाबतचे ठोस उत्तर आले नाही, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

सीसीटीव्हीवर खर्च करण्याची तयारी नाही !

मुंबईत केवळ पावसाळ्यादरम्यान महापालिकेला अधिकच्या लाइव्ह प्रक्षेपणाची गरज असते. त्यानंतर पालिकेला या प्रक्षेपणाचा अधिक उपयोग होत नाही. त्यामुळे पालिका सीसीटीव्ही कॅमेऱ्यांवर कोट्यवधी रुपये खर्च करायला तयार नाही. याचा खर्च दुसऱ्या ठिकाणी करता येऊ शकतो, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटींवर दिली.

४० हून अधिक पक्ष्यांना वाचवले

मुंबई आणि आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये गेल्या ४८ तासांत झालेल्या मुसळधार पावसामुळे ४० हून अधिक वन्यजीव, प्रामुख्याने पक्षी, वाचवण्यात आले, अशी माहिती एका प्राणी कल्याण संस्थेच्या पदाधिकाऱ्याने मंगळवारी दिली. मुसळधार पावसामुळे आणि जोरदार वाऱ्यांमुळे पक्ष्यांना व इतर प्राण्यांना पंख मोडणे, घरट्यांतून खाली पडणे आणि विस्थापन यांसारख्या दुखापती झाल्या, असे रेस्किंक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअरचे संस्थापक अध्यक्ष पवन शर्मा यांनी सांगितले.

एका पंख मोडलेल्या मोरापासून ते जखमी फ्लेमिंगोपर्यंत ४० हून अधिक वन्य प्राणी वाचवण्यात आले. मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांत गेल्या ४८ तासांत वन विभागाच्या समन्वयाने या पक्षांना वाचविण्यात आले. मान्सून लवकर सुरू झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे शर्मा यांनी सांगितले. मुंबई आणि परिसरातील जिल्ह्यांमधून आमच्या हेल्पलाईनवर जखमी व विस्थापित प्राण्यांच्या मदतीसाठी सतत कॉल येत आहेत. आमच्या टीम्स दिवसरात्र काम करत आहेत. या पक्ष्यांना वाचवून त्यांच्यावर उपचार करून त्यांना पुन्हा जंगलात सोडत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्याच्या बचाव मोहिमेतील आकडेवारीनुसार पक्ष्यांना सर्वाधिक फटका बसला आहे, त्यानंतर सरीसृप आणि सस्तन प्राणी आहेत, अशी माहिती शर्मा यांनी दिली. वन्यप्राण्यांना कुठलीही मदत हवी असल्यास वन विभागाच्या हेल्पलाईनवर किंवा जवळच्या प्राणी कल्याण संस्थांच्या स्वयंसेवकांना माहिती द्यावी, असे आवाहन शर्मा यांनी नागरिकांना केले आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश