प्रातिनिधिक छायाचित्र Pixabay
मुंबई

पावसाळ्यासाठी 'बेस्ट' सज्ज: वीजपुरवठा खंडित, तर 'माय बेस्ट' वर तक्रार करा

ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी बेस्टतर्फे नियंत्रण कक्ष आठवड्याच्या प्रत्येक दिवशी २४ बाय ७ कार्यरत असणार...

Swapnil S

मुंबई : पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबणे, वाहतूक कोंडीची समस्या यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची शक्यता अधिक असते. वीजपुरवठा खंडित झाल्यास 'माय बेस्ट' या ॲपवर तक्रार दाखल करा, तक्रारींचे वेळीच निवारण करण्यासाठी पावसाळ्यात अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येतील, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले. यंदाच्या पावसाळ्यात वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्ट उपक्रम सज्ज झाला असून, नियंत्रण कक्ष २४ बाय ७ कार्यरत असणार आहे.

ग्राहकांच्या तक्रारींच्या निवारणासाठी बेस्टतर्फे नियंत्रण कक्ष आठवड्याच्या प्रत्येक दिवशी २४ बाय ७ कार्यरत असणार आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार करण्यासाठी वीजग्राहकांनी त्यांचा वीजग्राहक क्रमांक अथवा वीज मापक क्रमांक नोंदवावा. फ्युज कंट्रोल दूरध्वनी क्रमांक विज देयकावर छापलेले आहेत. वीजग्राहक क्रमांक (उदाहणार्थ १००-०२६-०८९०० असा) विद्युत देयकाच्या अगदी वरील बाजूस उजव्या कोप-यात छापलेला आहे. तसेच वीज मापक क्रमांक हा विद्युत देयकाच्या मागील बाजूस, मध्यभागी असलेल्या टेबलच्या पहिल्या रकाण्यात दर्शविण्यात येतो या दोन पैकी एक क्रमांक तक्रार नोंदविताना आपल्या जवळ असणे अपेक्षित आहे, जेणेकरुन तक्रारीचे निवारण जलद गतीने करता येईल. वीजग्राहक त्यांच्या वीज पुरवठाबाबतच्या तक्रारी 'MiBest' या ॲपवर नोंदवू शकतात. या ॲपवर वीज ग्राहक त्यांच्या नोंदणीकृत भ्रमणध्वनी (मोबाईल) क्रमांकावर गुगल प्ले स्टोअर आणि ॲपल ॲप स्टोअरवरून डाऊनलोड करु शकतात.

इलेक्ट्रिक मीटर बॉक्स उंचीवर बांधा!

पावसाच्या पाण्यापासून वीज मापक व संच मांडणींचा बचावासाठी वीज मापक केबिन सिमेंटने बांधून घ्या, तसेच केबिन जमिनीपासून उंचावर बांधा जेणे करुन त्यात पावसाचे पाणी गळणार/केबिनमध्ये शिरणार नाही केबिन लाकडी असल्यास ती योग्य प्रकारे सुरक्षित करा.

परवानाधारकांकडून वीज जोडणी घ्या!

परवानाधारक विद्युत ठेकेदारांकडून आल्या वीजमापकांच्या केबिनपासून घरापर्यंतचे वायरिंग तसेच घरातील विद्युत उपकरणांचे वायरिंग व विद्युत संचमांडणी तपासून घ्या. तसेच आपल्या संच मांडणीमध्ये योग्य रेटींगच्या इएलसीबीचा वापर करा.

... तर मुख्य स्विच बंद करा!

अतिवृष्टीच्या वेळी किंवा वीजमापक केबिनमध्ये पाणी गळू लागल्यास किंवा पाणी शिरले असता, आपल्या घरातील वीजेचे मुख्य स्वीच बंद करा विद्युत संच मांडणीतील त्रुटी पूर्णपणे दूर झाल्यानंतर तसेच परवानाधारक विद्युत कंत्राटदाराने अथवा बेस्ट उपक्रमाच्या कर्मचाऱ्यांने सुरक्षिततेची खात्री दिल्यानंतरच वीज पुरवठा सुरू करा.

हे करू नका

वीजमापकांच्या केबिनमध्ये पाणी गळत असल्यास हातमोजे, इन्सुलेटेड प्लॅटफार्मचा वापर केल्याशिवाय संच मांडणीस उपकरणे रबरी हातमोजे घातल्याशिवाय स्पर्श करू नका. कोणत्याही परिस्थितीत विजेची ठिणगी पडत असेल, तसेच पाणी ठिबकत/गळत असेल, तर मार्गप्रकाश स्तंभांना, रस्त्यावर असणाऱ्या लाल रंगाच्या डिस्ट्रिब्युशन पिलर्स व केबिनमधील वीजमापकांना स्पर्श करू नका.

तेल कंपन्यांकडून इंधन गुणवत्ता तपासणीत मोठी वाढ; सोशल मीडियावरील चर्चेची इंधन वितरण कंपन्यांकडून खबरदारी

Mumbai : घराबाहेर खेळत असताना दोन मुलींचे अपहरण; पोलिसांनी उत्तराखंडमधून केली सुखरूप सुटका, आरोपी अटकेत

१५ वर्षांचा संसार संपला! आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर विभक्त; मुलीबाबत पोस्टमध्ये काय म्हटलं?

Driving Licence : १ ऑगस्टपासून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी डोमिसाइल प्रमाणपत्र बंधनकारक होणार? जाणून घ्या नवे नियम

Mumbai Hit-and-Run : विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या दुचाकीने ९ वर्षीय मुलीला उडवले; चालक फरार, CCTV मध्ये घटना कैद