मुंबई

BMC चा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका; आफ्रिकेतील माऊंट किलीमांजारोवर फडकवला तिरंगा

Swapnil S

मुंबई : मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात कार्यरत सीमा बापू माने यांनी २६ जानेवारीला आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत माऊंट किलीमांजारो हे सर करून देशाच्या संविधानाची प्रस्तावना १९,३४१ फूट (५,८९५ मी) उंचीवर वाचली. भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधूतेचा जगभर प्रसार करत आहेत. झाडांची लागवड करणे, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या उद्यान विभागाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर डंका वाजला आहे.

मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागात उद्यान विद्या सहाय्यक म्हणून कार्यरत घाटकोपर भटवाडी येथे राहणाऱ्या सीमा बापू माने यांनी २६ जानेवारी २०२४ रोजी आफ्रिका खंडामधील सर्वात उंच पर्वत माऊंट किलीमांजारो हे सर करून आपल्या देशाच्या संविधानाची प्रस्तावना १९,३४१ फूट (५,८९५ मी) उंचीवर वाचली. या मोहिमेआधी सीमा माने यांनी बेसिक आणि ॲडव्हान्स माऊंटेनिअरिंग कोर्स यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. आपल्या जीवनातील अनेक अडचणींना मात देत वयाच्या ३८ व्या वर्षी अवघ्या २ वर्षाच्या कालावधीत त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या देशाचे व बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नाव रेखाटले आहे. पालिकेच्या उद्यान खात्याचे प्रमुख उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सोलापूरमधील ३६० एक्सप्लोरर कंपनीमार्फत त्यांनी ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली असून भविष्यात माऊंट एव्हरेस्ट सहित उर्वरित पाचही खंडातील सर्वोच्च शिखरे पादाक्रांत करण्याचा सीमा माने यांचा निर्धार आहे.

अनेक गड सर!

हिमाचल प्रदेशमधील फ्रेंडशिप पीक, सिक्कीममधील काब्रू डोम कॅम्प १ सर केले आहे. तसेच सह्याद्रीमधील वजीर पिनॅकल, स्कॉटिश कडा, तैलाबैला, नवरा पिनॅकल, नवरी पिनॅकल, भैरवगड, हरिश्चंद्र गड, कळसूबाई, माहुली गड व इतर अनेक गड सर केले आहेत. तसेच काश्मीरमधील अवघड तीन तलावांचा तारसार, मारसार आणि सुंदरसार लेक ट्रेक यशस्वीरीत्या पूर्ण केलेला आहे.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल