Mumbai : बेस्ट बसच्या धडकेत ‘ओला’ चालकाचा मृत्यू; मालाड पुष्पा पार्क परिसरातील घटना 
मुंबई

Mumbai : बेस्ट बसच्या धडकेत ‘ओला’ चालकाचा मृत्यू; मालाड पुष्पा पार्क परिसरातील घटना

मालाड पूर्व येथील पुष्पा पार्क परिसरात गुरुवारी सकाळी ६.५० वाजता वडाळा डेपोत जाणाऱ्या बेस्ट बसने उभ्या असलेल्या ओला कारला धडक दिली.

Swapnil S

मुंबई : मालाड पूर्व येथील पुष्पा पार्क परिसरात गुरुवारी सकाळी ६.५० वाजता वडाळा डेपोत जाणाऱ्या बेस्ट बसने उभ्या असलेल्या ओला कारला धडक दिली. या धडकेत ओला कॅबचालक रामचंद्र पाल (५०) यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

बस मार्ग क्रमांक ४४० वरील बस (क्रमांक ८१८४) सकाळी सुमारे ६.५० वाजता वडाळा डेपोकडे परतत होती. त्यावेळी पुष्पा पार्क येथे रस्त्याच्या कडेला उभी असलेल्या ओला कारला बसची धडक बसली. यावेळी कार चालक रामचंद्र पाल हे कार धुवत असताना बेस्ट बसच्या धडकेत त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

ही बस वडाळा आगाराची असून मातेश्वरी कंत्राटदाराची आहे. घटनेची माहिती मिळताच चौकशीसाठी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून अपघाताच्या कारणाचा तपास सुरू आहे.

रस्त्याच्या कामावरून प्रश्न विचारताच तरुणाच्या लगावली कानशिलात; मंत्री प्रवेश वर्मांचा Video सोशल मीडियावर व्हायरल

NCMC Card : अजून कार्ड काढलं नाही? १ ऑक्टोबरपूर्वी करा नोंदणी; कुठे अन् कशी करायची? वाचा संपूर्ण प्रक्रिया

Video : आशुतोष रांकांसह CJP चे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; सुटका न झाल्यास आसामला जाणार, अभिजीत दिपकेंचा इशारा

Mumbai : अनंत चतुर्दशीला नाही तर अंगारकी संकष्टीला होते अंधेरीच्या राजाचे विसर्जन; जाणून घ्या खास परंपरा

LPU Students Protest : बलात्काराच्या अफवेने विद्यार्थ्यांचा उद्रेक; कॅम्पसमध्ये जाळपोळ, महामार्गही रोखला, Video