(Photo-X)
मुंबई

Mumbai : ७ दिवसांत ५५० हून अधिक झाडांची पडझड

मुंबईत पावसाची सुरुवात होताच पडझडीचे सत्र सुरू झाले असून २७ जून ते ४ जुलै या ७दिवसांत तब्बल ५५० हून अधिक झाड किंवा झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईत पावसाची सुरुवात होताच पडझडीचे सत्र सुरू झाले असून २७ जून ते ४ जुलै या ७दिवसांत तब्बल ५५० हून अधिक झाड किंवा झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

शनिवार रात्रीपासून बरसणाऱ्या पावसाचा जोर रविवारी कायम होता. जोरदार वाऱ्यासह बरसणाऱ्या पावसामुळे मुंबईत ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. दादर शिवाजी पार्क परिसरातच ८ ते १० झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. सुदैवाने या दुर्घटनेत कोणी जखमी झालेले नाही.

२०१८ मध्ये पालिकेने झाडांची गणना केली होती. त्यानुसार मुंबईत २९ लाख ७५ हजार २८३ झाड आहेत. मात्र गेल्या काही वर्षांत झाड झाडांच्या फांद्या कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत. ३० जून रोजी चेंबूर येथे स्कूल व्हॅन वर पिंपळाचे झाड कोसळले आणि ११ वर्षिय विहान श्रीवास्तव विद्यार्थ्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. तर सांताक्रूझ पश्चिम येथील रहेजा कॉलनी जवळच झाडांची पहाणी करण्यासाठी कर्मचारी गेले होते. याच वेळी भलेमोठे झाड कोसळले आणि ८ जण जखमी झाल्याची घटना घडली.

मुंबईत कुठे व किती झाडे

  • सरकारी जागेवर - १०,६७,६४१

  • खासगी जागेवर - १५ लाख ५१ हजार १३२

  • औद्योगिक क्षेत्रात - ९,३३७

  • पार्क क्षेत्रात - १,०१,३६१

  • रस्त्यांशेजारी - १,८५, ९६४

  • अन्य ठिकाणी - ५९,८४८

  • एकूण - २९,७५,२८३

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कोसळधार! मुंबई, ठाणे, पालघरमध्ये आज 'ऑरेंज अलर्ट'; शाळा-कॉलेज बंद

रायगड जिल्ह्यात हाहाकार! मुंबई-गोवा महामार्ग ८ तास ठप्प; अंबा, कुंडलिका, पाताळगंगाने ओलांडली धोका पातळी

भारताची एकता आणि प्रगतीसाठी समर्पित जीवन

आजचे राशिभविष्य, ६ जुलै २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

ही अनास्था काय कामाची!