प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

गणेशमंडळांसाठी महत्त्वाची बातमी! गणेशोत्सव काळात मुंबईत ‘डीजे’ला बंदी

मुंबई पोलिसांनी या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

Swapnil S

मुंबई : गणेशोत्सव अवघ्या १५ दिवसावर आलेला असतानाच मुंबई पोलिसांनी ‘डीजे’चा वापर करणाऱ्या मंडळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे.

मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी ‘डीजे’ वाजवल्यास कायदेशीर कारवाईला त्यांना सामोरे जावे लागेल, असे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे, गणेशोत्सव काळात डीजेचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांनी या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. गणेशोत्सव मंडळांनी नियमांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 'न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित मंडळांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आलेली आहे.' या आदेशामुळे गणेशोत्सवातील डीजेच्या वापरावर पूर्णपणे बंदी येणार आहे. मुंबईतील गणेशोत्सव मंडळांनी या नियमांचे गांभीर्याने पालन करणे आवश्यक आहे.

उत्सवात प्रदूषणकारी ध्वनिक्षेपक, डीजे लावण्यावर पर्यावरणप्रेमींचा आक्षेप असून रुग्णालय तसेच निवासी परिसरात त्रास होत असल्याच्या तक्रारी आहेत.

Navi Mumbai : हापूस आंबा झाला स्वस्त; APMCमध्ये दरात घट, १५००रुपयांपासून पेटी उपलब्ध

Mumbai : ४०० टन वजनी क्रेन उलटली; BKC मध्ये मेट्रो कामादरम्यान मोठा अपघात

पुण्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञाला 'डिजिटल अरेस्ट'च्या जाळ्यात ओढले; सायबर चोरट्यांनी तब्बल ७८ लाख रुपये लुटले

"मुलगा माझ्यासारखा दिसत नाही..."; पत्नीवरील संशयामुळे पित्यानेच घेतला सहा वर्षीय मुलाचा जीव; चौकशीत धक्कादायक खुलासा

वेदांता पॉवर प्लांट स्फोटातील मृतांचा आकडा वाढला; मॅनेजमेंटविरूद्ध FIR नोंदवा, न्यायालयीन चौकशी करा - काँग्रेसची मागणी