मोहरम मिरवणुकीतील विषबाधेचा कट उघडकीस; पोलिसांची धडक कारवाई; १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त 
मुंबई

Mumbai : मोहरम मिरवणुकीतील विषबाधेचा कट उघडकीस; पोलिसांची धडक कारवाई; १४,९०० विषारी कॅप्सूल जप्त

मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना लक्ष्य करून मोठी दुर्घटना घडवण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी पुण्याच्या एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून झिंक फॉस्फाइड (उंदीर मारण्याचे विष) भरलेल्या तब्बल १४,९०० कॅप्सूल जप्त केल्या आहेत.

Swapnil S

मुंबई : मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भाविकांना लक्ष्य करून मोठी दुर्घटना घडवण्याचा कट मुंबई पोलिसांनी उधळून लावला आहे. पोलिसांनी पुण्याच्या एका व्यापाऱ्याला ताब्यात घेतले असून, त्याच्याकडून झिंक फॉस्फाइड (उंदीर मारण्याचे विष) भरलेल्या तब्बल १४,९०० कॅप्सूल जप्त केल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने मोहरमच्या मिरवणुकीदरम्यान या विषारी कॅप्सूलचे वाटप करून मोठा अनर्थ घडवण्याचा कट आखला होता. सुदैवाने, या कॅप्सूल वितरित होण्यापूर्वीच पोलिसांनी संशयित आरोपीला जेरबंद केले.

पोलिसांच्या सतर्कतेमुळे कट उधळला

मोहरमच्या मिरवणुकीत सहभागी असलेल्या काही लोकांना या कॅप्सूलचे वाटप करत असताना तो पोलिसांच्या नजरेत आला. पहाटे ४ च्या सुमारास एका व्यक्तीला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने हालचाली करत संशयिताला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान, त्याने मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा आपला इरादा असल्याचे कबूल केले आहे.

अशी झाली कारवाई

आरोपीची ओळख फैयाज प्रेमजी (रा. विमान नगर, पुणे) अशी पटली आहे. पुण्यात पेंटचा व्यवसाय करणारा प्रेमजी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील डोंगरी भागातील एका गेस्ट हाऊस आणि डॉर्मिटरीमध्ये मुक्कामी होता. जे. जे. आणि भायखळा मार्गावरून जाणाऱ्या मोहरमच्या मिरवणुकीला लक्ष्य करण्याचा त्याचा मानस होता. आरोपीने ५० किलो झिंक फॉस्फाइड खरेदी केले होते आणि अनेक दिवस आपल्या राहत्या ठिकाणी ते कॅप्सूलमध्ये भरण्याचे काम करत होता. प्रत्येक कॅप्सूलमध्ये साधारणपणे एक ग्रॅम झिंक फॉस्फाइड भरले होते.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai Local Train Update : कल्याण-बदलापूर मार्गिका २०२८ मध्ये; बोरिवली-विरार ५ व्या आणि ६ व्या मार्गिकेचे काम ३०% पूर्ण

Mumbai: चर्चगेटच्या आयकर भवनात भीषण आग; अडकलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न, VIDEO

Pune : खर्च भागेना म्हणून स्वतःच्याच अपहरणाचा बनाव! रडतानाचा VIDEO पाठवून कुटुंबीयांकडून मागितले ५ लाख

पश्चिम बंगालमध्ये मोठी दुर्घटना! पहाटे गाढ झोपेत असतानाच हॉटेलला भीषण आग; ७ जणांचा करूण अंत, अनेकजण गंभीर, VIDEO

महिलेचे फोटो काढले, जाब विचारला तर पिस्तूल रोखली; दिल्ली मेट्रोत गोंधळ, CISF जवान निलंबित