Mumbai : पवई तलाव जलपर्णीमुक्त होणार; CSR फंडातील निधीचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी होणार (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : पवई तलाव जलपर्णीमुक्त होणार; CSR फंडातील निधीचा वापर पर्यावरण संवर्धनासाठी होणार

पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : पवई तलाव परिसराचे नैसर्गिक जतन आणि पुनरुज्जीवन प्रकल्प अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या वतीने तलावातील जलपर्णी, तरंगत्या वनस्पती काढण्यात येणार आहेत. पालिकेच्या पर्यावरण विभागामार्फत सीएसआरच्या सहाय्याने तलावातील जलपर्णी काढणे तसेच तिचा शाश्वत पुनर्वापर किंवा पुनर्चक्रण करण्यासाठी पात्र संस्था, कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागविण्यात आली आहे. या उपक्रमामुळे महापालिकेवर कोणताही आर्थिक भार पडणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

पवई तलावातील वाढत्या जलपर्णीच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पवई तलावात वाढणारी जलपर्णी पाण्याच्या गुणवत्तेसह तलावाच्या पर्यावरणीय समतोलावर परिणाम करत आहे. जलपर्णीचा दाट थर तयार झाल्याने पाण्यातील विरघळलेल्या प्राणवायूचे प्रमाण घटते. त्यामुळे मासे आणि इतर जलचरांच्या अस्तित्वावर परिणाम होतो. तसेच डासांची पैदास वाढणे, दुर्गंधी निर्माण होणे आणि तलावाचे सौंदर्यही कमी होण्याच्या समस्या उद्भवतात.

जलपर्णीपासून कंपोस्ट, सेंद्रिय खत, बायोगॅस

केवळ जलपर्णी काढण्यावर भर नसून ती नती कंपोस्ट, सेंद्रिय खत, बायोगॅस किवा अन्य पर्यावरणपूरक उत्पादनांसाठी वापरण्यावरही भर देण्यात आला आहे. त्यामुळे कचऱ्याचे मूल्यवर्धन होऊन शाश्वत व्यवस्थापनाला चालना मिळणार आहे. सीएसआर निधीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविल्याने महापालिकेचा खर्च वाचणार असून खासगी क्षेत्राचा सहभाग वाढणार आहे. पर्यावरण संरक्षण, तलावातील जैवविविधतेचे संवर्धन आणि जलस्रोतांचे दीर्घकालीन जतन या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : उघड्या मॅनहोलसाठी स्वतंत्र चॅटबॉट; लोकेशन अन् फोटो पाठवून करता येणार तक्रार

Mumbai : सरकारी डॉक्टर खासगी प्रॅक्टिस करतोच असे गृहित धरता येणार नाही; अपघात भरपाई प्रकरणात उच्च न्यायालयाचा निर्णय

नौदलाच्या ताफ्यात 'आयएनएस महेंद्रगिरी' दाखल; सागरी सुरक्षा अधिक भक्कम - ‘माझगाव डॉक’ने बनवली अत्याधुनिक युद्धनौका

एकनाथ खडसेंची भाजपमध्ये घरवापसी? उत्तर महाराष्ट्रात राजकीय चर्चांना उधाण

मुंबईत बाल-माता मृत्युदरात घट; BMC च्या आरोग्य जागरूकतेचा परिणाम