मुंबई

Mumbai : मालमत्ता कर 'ऑनलाईन' भरण्याची प्रक्रिया सुरळीत

नागरिकांनी मालमत्ता कर भरणा करण्यासाठी प्रथम स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध असलेल्या जीपे - युपीआय सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे.

Swapnil S

मुंबई : मालमत्ता कर ऑनलाईन भरण्याच्या प्रक्रियेत वन टाईम पासवर्ड (ओटीपी) मिळण्यात अडचणी येत होत्या. करनिर्धारण व संकलन खात्याने याबाबत प्रणालीस्तरावरील त्रुटी दूर केल्या आहेत. त्यामुळे मालमत्ता कर 'ऑनलाईन' भरण्याची प्रक्रिया सुरळीत झाली आहे, असे महापालिकेने स्पष्ट केले.

नागरिकांनी मालमत्ता कर भरणा करण्यासाठी प्रथम स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध असलेल्या जीपे - युपीआय सुविधेचा वापर करावा, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. कर निर्धारण व संकलन खात्याने २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठी मालमत्ता कराची सुमारे सव्वा सहा लाख देयके निर्गमित केली आहेत. बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या https:// www.mcgm. gov.in या संकेतस्थळावर मालमत्ताकर देयके उपलब्ध आहेत. मालमत्ता करप्रणालीचे सर्व्हर नवीन क्लाऊडवर स्थलांतरीत केले आहेत.

राज्यात ६० टक्के मतदान; सर्वाधिक ६९.२२ टक्के मतदान गडचिरोलीत

सिंहासनासाठी काँटे की टक्कर! ‘एक्झिट पोल’च्या आकड्यांमध्ये संमिश्र कौल

सुसंस्कृत महाराष्ट्रातही मतदानादरम्यान हिंसक घटना

चार राज्यांतील पोटनिवडणुकीत ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान

मुंबईत मतदारांमध्ये निरूत्साह! केवळ ५१.४१ टक्के मतदान; अनेक मतदारांची मतदानाकडे पाठ