मिसिंग लिंकवर प्रारंभी वेगमर्यादा निश्चित; हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमीची वेगमर्यादा, महाराष्ट्र दिनी प्रकल्पाचे लोकार्पण  
मुंबई

मिसिंग लिंकवर प्रारंभी वेगमर्यादा निश्चित; हलक्या वाहनांसाठी ताशी १०० किमीची वेगमर्यादा, महाराष्ट्र दिनी प्रकल्पाचे लोकार्पण

मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवासात ३० मिनिटांची बचत करणाऱ्या मिसिंग लिंकवर धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवासात ३० मिनिटांची बचत करणाऱ्या मिसिंग लिंकवर धोकादायक मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा वाहनांना द्रूतगती महामार्गाचा वापर करावा लागेल, तर मिसिंग लिंकवर बोगद्यामध्ये हलक्या वाहनासाठी ताशी १०० किमी, तर बसेस आणि इतर प्रवासी वाहनासाठी ताशी ८० किमीची वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गाच्या घाटातील वाहतूककोंडी टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामहामंडळाने साडेदहा किलोमीटर लांबीचा मिसिंग लिंक बांधला आहे. सुमारे ६ हजार ७०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या या मिसिंग लिंक प्रकल्पाचे लोकार्पण येत्या महाराष्ट्र दिनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. हा प्रकल्प सुरू होत असताना वाहतूक विभागाच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सोमवारी मिसिंग लिंकवरील वाहतुकीबाबत अधिसूचना जारी केली.

दोन महिन्यांपूर्वी मुंबई-पुणे द्रूतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपिलीन या ज्वलनशील वायूची वाहतूक करणारा टँकर उलटल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने ज्वलनशील, स्फोटके किंवा धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना मिसिंग लिंकवर पूर्णतः बंदी घातली आहे.

UPI शुल्कावर GST? पात्र व्यापाऱ्यांना इनपुट टॅक्स क्रेडिटचा दावा करता येणार

Mumbai : स्नॅपचॅटवर मैत्री, व्हिडिओ कॉलचं रेकॉर्डिंग अन् ब्लॅकमेलिंग; तरुणीकडून ४० हजार उकळले, आरोपी पंजाबमधून अटकेत

सोने हॉलमार्किंग शुल्कात वाढ; सणासुदीच्या हंगामापूर्वी ₹४५ वरून २७५ पर्यंत भार

कृषी उत्पन्न बाजार समित्या रोजगारनिर्मितीचे केंद्र बनवणार; पणन मंत्री जयकुमार रावल यांचे प्रतिपादन

Thane : शासकीय रुग्णवाहिकांची डिझेलसाठीची धावपळ थांबणार! 'ड्राईव्ह ट्रॅक प्लस' कार्डमुळे इंधनाची अडचण दूर होणार