प्रातिनिधिक छायाचित्र 
मुंबई

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; रेल्वे प्रवाशांची होणार गैरसोय

रेल्वे रूळ, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार (ता.१६) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तिन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

Swapnil S

मुंबई : रेल्वे रूळ, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीचे काम करण्यासाठी मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार (ता.१६) मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तिन्ही मार्गावर ब्लॉक असल्याने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.

मध्य रेल्वेच्या मुख्य उपनगरीय विभागांवर सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. सीएसएमटीहून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि विद्याविहार स्थानकावर डाउन धीम्या मार्गावर पुन्हा वळवल्या जातील. घाटकोपरहून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील गाड्या विद्याविहार आणि सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.

हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान पोर्ट मार्ग वगळून अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत ब्लॉक असेल. पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत आणि सीएसएमटीहून बेलापूर/पनवेलला जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत रद्द राहतील.

  • पश्चिम रेल्वे मार्गावर बोरीवली ते राम मंदिर दरम्यान अप जलद मार्गावर तसेच राम मंदिर ते गोरेगाव स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला आहे.

BMC महापौर निवडणूक ३१ जानेवारीला; २८ जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत

उल्हासनगरमधील 'बहुमत का हुकले?' विरोधक नव्हे, आपलेच ठरले अडसर; अंतर्गत फूटीमुळे राजकीय आत्मघात

मेट्रो लाइन '७ ए'ला मोठी चालना ; २४०० मिमी अपर वैतरणा जलवाहिनी वळवण्याचे काम पूर्ण

चंद्रपूरमध्ये विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्यात सहमती; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची यशस्वी मध्यस्थी

स्वतःच्या प्रकल्पांना 'राम कुटीर' नाव का दिले नाही; KEM चे नाव बदलण्यावरून कोल्हेंचा लोढांना सवाल