प्रातिनिधिक छायाचित्र एक्स @Raahgiri_Fdn
मुंबई

Mumbai : बेशिस्त वाहनचालकांवर 'स्पाईक' इलाज; तीन रस्त्यांवर प्रयोग यशस्वी, इतर आठ ठिकाणी मागणी

रस्त्यांवर चुकीच्या मार्गाने वाहन चालवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या

Swapnil S

मुंबई : एकेरी मार्गावर चुकीच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांना रोखण्यासाठी कुलाब्यातील तीन रस्त्यांवर स्पाईक स्पीड ब्रेकर बसविण्यात आले. त्याचा सुपरिणाम दिसत असून रहिवाशांच्या वाहतूक विषयक तक्रारी कमी झाल्या आहेत.  

कुलाबा येथील हा प्रयोग लक्षात घेता भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी संपूर्ण शहरात, विशेषत: दक्षिण मुंबईत चुकीच्या बाजूने वाहन चालवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी स्पाईक स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी केली आहे. महापालिका आयुक्त आणि सहपोलीस आयुक्त (वाहतूक) यांना पत्र लिहून नार्वेकर यांनी कुलाब्यातील तीन रस्त्यांवर हे स्पाईक स्पीड ब्रेकर बसविण्यासाठी पाठपुरावा केला होता.  त्या रस्त्यांवर चुकीच्या मार्गाने वाहन चालवण्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्या असल्याचे त्यांनी नमूद केले. 

कुलाब्यातील एसबीएस रोड, नाथलाल पारेख रोड आणि कुलाबा क्रॉस लेन या तीन रस्त्यांवर स्पाईक स्पीड ब्रेकर लावण्यात आले आहेत. याआधी मलबार हिलमधील बी. जी. खेर मार्गावर हे स्पाईक स्पीड ब्रेकर लावण्यात आले होते. 

नार्वेकर म्हणाले की, लेनची शिस्त आणि पादचाऱ्यांची सुरक्षा राखण्यासाठी हे स्पाईक स्पीड ब्रेकर प्रभावी ठरले आहेत. या यशामुळे कुलाब्यातील आणखी आठ रस्त्यांवर हे स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी आम्ही केली आहे.

आम्ही रस्त्यावर चिन्हे लावण्याचा प्रयत्न केला परंतु वाहनचालक त्याकडे दुर्लक्ष करीत होते. त्यामुळे हे स्पाईक्स बसवण्यासाठी आम्ही आमच्या स्थानिक प्रतिनिधीकडे पाठपुरावा केला. तीन रस्त्यावर खूपच चांगला परिणाम आम्हाला दिसत आहे. ज्या रस्त्यावर पादचाऱ्यांची जास्त ये-जा असते आणि शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिक वारंवार येतात त्याठिकाणी अशा स्पीड ब्रेकरची गरज आहे. - बेला शाह, रहिवासी, कुलाबा.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन