मुंबई

Mumbai : आईची हत्या करून मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, वरळी परीसरातील घटना

वरळी पोलिसांनी मुलाविरोधात आईची हत्या करून नंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Swapnil S

मुंबई : आर्थिक वादातून झालेल्या भांडणानंतर एका ७७ वर्षांच्या महिलेची तिच्या मुलाने हत्या करून नंतर स्वतः गळ्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार वरळी परिसरात घडला.

ललिता तिरुगनना संबनधहम असे या हत्या झालेल्या महिलेचे नाव असून जखमी झालेल्या बालशनमुघम कुप्पूस्वामी या मुलावर व्होकार्ट रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्याविरुद्ध वरळी पोलिसांनी आईची हत्या करून नंतर आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

ललिता ही वरळीतील गांधीनगर शिवसंकल्प सोसायटी तर तिचा विवाहीत मुलगा बालशनमुघम हा पेडर रोडच्या दरभंगा हाऊस अपार्टमेंटमध्ये राहतो. बालशनमुघम याच्यावर काही कर्ज होते. या कर्जाची परतफेडीसाठी त्याला पैशांची गरज होती. याच कारणासाठी शुक्रवारी रात्री तो त्याच्या आईच्या वरळीतील राहत्या घरी आला होता. पैशांवरून त्यांच्यात प्रचंड शाब्दिक बाचाबाची झाली. त्यातून रागाच्या भरात त्याने त्याच्या आईची गळा आवळून हत्या केली होती.

हत्येनंतर तो प्रचंड घाबरला आणि त्याने घरातील चाकूने स्वतच्या गळ्यावर वार केले. हा प्रकार नंतर स्थानिक रहिवाशांच्या निदर्शनास आला होता. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. या दोघांनाही पोलिसांनी तातडीने नायर रुग्णालयात दाखल केले. तिथे ललिताला डॉक्टरांनी मृत घोषित केले तर बालशनमुघमला नंतर व्होकार्ट रुग्णालयात हलविण्यात आले.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी