मुंबई

Mumbai : भातसाच्या दूषित पाण्याचा टँकरद्वारे उपसा

मुंबईसाठी तानसा, वैतरणा तसेच भातसा या धरणातून पाणी दिले जाते. भातसाचे पाणी उघड्या नाल्यातून पिसा डॅमपर्यंत नेले जाते.

Swapnil S

अरविंद भानुशाली / मुंबई

मुंबईसाठी तानसा, वैतरणा तसेच भातसा या धरणातून पाणी दिले जाते. भातसाचे पाणी उघड्या नाल्यातून पिसा डॅमपर्यंत नेले जाते. मधल्या दरम्यान या पाण्याचा उपसा होत असून शहापूर- कसारा-खर्डी-मोखावणा या भागात सध्या प्रचंड पाण्याची समस्या आहे. परंतु भातसाचे पाणी भातसा नदीमधून सापगाव मार्गे सोडले जाते.

भातसा नदीच्या जलाशयाला लागून लिबर्टी ऑइल मिलने पंप बसविला आहे. या लिबर्टी ऑइल कंपनीतून वनस्पती तूप व तेलाचे पदार्थ बाहेर पडतात. या पंपाद्वारे हे सर्व दूषित पाणी भातसा नदीत सोडले जाते. त्या दूषित पाण्याचा तेलाचा तवंग पाण्यावर तरंगताना दिसतो आणि अशा परिस्थितीतच भातसा नदीजवळ सापगाव व खुटघर दरम्यान शंकराच्या मंदिराजवळ पाण्याच्या टँकरच्या रांगा लागलेल्या दिसतात तेथे तपास करता किमान रोज १५० ते १७० टँकरमधून भातसाच्या पाण्याचा उपसा होतो त्यावर कुणाचे नियंत्रण आहे का याचा तपास घेता कुठलेही नियंत्रण नसल्याचे दिसून येते.

टँकरमध्ये भरलेले पाणी कसाऱ्यापासून कल्याणपर्यंत पुरविले जाते भातसा नदीचा एवढा उपसा झाला नव्हता. शहापूर जवळून कांबारा वेहळवली तर पुढे भिवंडीपर्यंत उघड्या नाल्यातून पाणी जात असते मात्र ते पाणी शहापूरकरांना मिळत नाही.

शहापूरकरांना पाणी पाहिजे म्हणून रिकामे हांडे घेऊन संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांचा लॉंग मार्च मुंबई महापालिका कार्यालयापासून मंत्रालयापर्यंत गेला होता. त्यावेळी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीसच होते.

मधली पाच वर्षे होऊन गेली मात्र शहापूरकरांना भातसा उघडा कॅनलमधून पाणीपुरवठा योजना काही झाली नाही.

शहापूरकरांसाठी इगतपुरीजवळील भावली धरणातून पाणी देण्याची योजना करण्यात येते प्रशासकीय मान्यता देऊन दोन वर्षे उलटून गेली तरीपण भावली धरणातून पाणी काही मिळत नाही.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी