'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : भाडेवाढीने प्रवासी संतापले; टॅक्सी किमान भाडे ३३, रिक्षा २७ रुपये

मुंबई महानगर क्षेत्रातील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा प्रवाशांना १ सप्टेंबरपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा प्रवाशांना १ सप्टेंबरपासून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. राज्य सरकारने जवळपास १८ महिन्यांनंतर टॅक्सी आणि रिक्षांच्या भाडेवाढीस मंजुरी दिली आहे. त्यानुसार टॅक्सीचे किमान भाडे ३१ रुपयांवरून ३३ रुपये, तर ऑटोरिक्षाचे किमान भाडे २६ रुपयांवरून २७ रुपये होणार आहे. टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असले, तरी नियमित प्रवाशांनी दैनंदिन प्रवासाचा खर्च आणखी वाढणार असल्याने संताप व्यक्त केला आहे.

मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) गुरुवारी झालेल्या बैठकीत भाडेवाढीला मंजुरी दिली. यापूर्वी १ फेब्रुवारी २०२५ रोजी भाडेवाढ लागू करण्यात आली होती. खटुआ समितीच्या सूत्रानुसार टॅक्सीचे प्रतिकिलोमीटर भाडे २०.६६ रुपयांवरून २१.९० रुपये, तर रिक्षाचे प्रतिकिमी भाडे १७.१४ रुपयांवरून १८.२२ रुपये होणार आहे. रिक्षाच्या पहिल्या १.५ किलोमीटरच्या भाड्याची रक्कम सरकारने २७ रुपये निश्चित केली आहे. इंधनाचे दर, वाहनांची किंमत, ग्राहक किंमत निर्देशांक, वाहन कर्जावरील व्याजदर आणि सरकारी कर यांचा विचार करून ही भाडेवाढ करण्यात आली आहे.

आधीच महागाईने त्रस्त असताना आता प्रवासालाही अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. यावेळी स्थानिक वाहतूक सेवांनी अधिक कार्यक्षम होणे गरजेचे आहे, असे ठाण्यातील एका प्रवाशाने सांगितले.

नियमित प्रवासी विशाल सिंह म्हणाले, मी रोज प्रवासासाठी रिक्षाचा वापर करतो. एक रुपयाची वाढ छोटी वाटू शकते; मात्र दररोज प्रवास केल्यास महिन्याच्या अखेरीस त्याचा मोठा परिणाम होतो.

दुसरे एक प्रवासी अमित रुंगटा यांनी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर आधीच ताण असताना भाडेवाढीचे समर्थन करणे कठीण असल्याचे सांगितले.

टॅक्सी आणि रिक्षा संघटनांनी भाडेवाढीचे स्वागत केले असले, तरी काही संघटनांनी ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी असल्याचे म्हटले आहे.

मुंबई रिक्षामेन्स युनियनचे सरचिटणीस थम्पी कुरियन यांनी सरकारने भाडेवाढीस मान्यता दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मात्र, एमएमआरटीएचा अधिकृत आदेश स्वाक्षरी झाल्यानंतरच भाडेवाढीची नेमकी रक्कम स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.

ऑटोरिक्षा चालक-मालक संघटना संयुक्त कृती समिती, महाराष्ट्रचे अध्यक्ष शशांक शरद राव यांनी ही वाढ अपुरी असल्याचे म्हटले. संघटनांनी टॅक्सीच्या भाड्यात ४ रुपये आणि रिक्षाच्या भाड्यात ३ रुपयांची वाढ अपेक्षित केली होती, असे त्यांनी सांगितले.

सीएनजी १० टक्क्याने वाढला

राज्य परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मागील भाडेवाढीनंतर सीएनजीच्या दरात ८ रुपये म्हणजेच १०.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. याशिवाय वाहनांच्या देखभालीसह अन्य परिचालन खर्चही वाढले आहेत. टॅक्सी संघटनेने प्रतिकिलोमीटर २५ रुपये भाड्याची मागणी केली होती. ती मान्य झाली असती तर किमान भाड्यात ४ रुपयांची वाढ झाली असती.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Pune : कुकरच्या दहा शिट्ट्या, तरीही वाटाणे शिजेनात; अंगणवाडीतील सेविकेची तक्रार, आधी निलंबन, नंतर निर्णय मागे

भटक्या कुत्र्यांना डिजिटल ओळख; QR कोडयुक्त परावर्तित कॉलर, रेबीजमुक्त मुंबईच्या दिशेने BMC चा पुढाकार

Mumbai : महापालिकेची जमीन इतर कामासाठी वापरली जाऊ शकत नाही; उच्च न्यायालयाचा इशारा

Mumbai : ५० फेलोच्या जागेसाठी बीटेक, डॉक्टरांचे अर्ज; ५० जागांसाठी ४५०० जणांचे आवेदन, महापालिकेत कंत्राटी भरती

MIDC युनिटवर मालमत्ता कर नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल