मुंबई

मुंबई टॅक्सीमन युनियनने दिली १ ऑगस्टला टॅक्सी संपाची हाक

देवांग भागवत

सरकार भाडेवाढीबाबत कोणताही निर्णय घेत नसल्याच्या निषेधार्थ मुंबई टॅक्सीमन युनियनने १ ऑगस्ट रोजी टॅक्सी संपाची हाक दिली आहे. पण या संपामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. युनियनने सरकारकडे भाड्यात १० रुपये वाढ करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच किमान भाडे २५ रुपयांवरून ३५ रुपये करण्याची मागणी केली आहे.

मुंबई टॅक्सीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. अशात वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन चालकांना रोज ३०० रुपयांचं नुकसान सहन करावं लागतं. अशात वाहतूक पोलिसही अनेकदा कारवाई करून पैसे उकळतात. यामुळे मुंबईतील काही ऑटोरिक्षा संघटनांनी असंही म्हटलं आहे की, ते ३१ जुलैपर्यंत सरकारच्या भाडेवाढीची वाट पाहतील, जर यावर विचार झाला नाही तर रिक्षाचाही संप असणार आहे. दरम्यान, ऑटो युनियन किमान भाड्यात ३ रुपये वाढीची अपेक्षा करत आहेत. म्हणजेच सरकारने किमान भाडे २१ रुपयांवरून २४ रुपये करावं अशी मागणी आहे. दरम्यान, एमएमआरटीए (मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ट्रान्सपोर्ट अथॉरिटी) या आठवड्यात ऑटोच्या भाड्यात वाढ करायची की नाही यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.

"भाडे वाढवण्याची खूप गरज आहे. कारण २०२१ मध्ये शेवटच्या भाडे सुधारणानंतर सीएनजीचा दर ४८ रुपयांवरून ८० रुपयांपर्यंत वाढला आहे." सरकारला शिफारस करण्यात आली होती की मागील भाडे सुधारणेनंतर सीएनजी २५ % पेक्षा जास्त वाढल्यास, टॅक्सीचे भाडे त्वरित सुधारित केले जावे.

- एएल क्वाड्रोस, टॅक्सी युनियनचे नेते

मुंबईत आज महायुती, मविआच्या सभा; मोदी-राज एका व्यासपीठावर, बीकेसीत उद्धव, पवार, केजरीवालांची उपस्थिती

‘आज जागतिक उच्च रक्तदाब दिन’; ३४ टक्के मुंबईकर ब्लडप्रेशरचे शिकार!

‘इंडिया’ आघाडीला बाहेरून पाठिंबा देणार,ममता बॅनर्जी यांची घोषणा

रोहितचा मुंबई इंडियन्ससाठी आज अखेरचा सामना? लखनऊविरुद्ध हंगामाचा शेवट गोड करण्याचे ध्येय

घाटकोपर बेकायदा होर्डिंग दुर्घटना : एटीसीच्या निवृत्त अधिकाऱ्यासह पत्नीचा दुर्दैवी अंत