पूनम अपराज/मुंबई
जमनाबाई नरसी इंटरनॅशनल स्कूलच्या क्रीडांगणाच्या प्रवेशद्वाराजवळ लॉरेन्स बिश्नोई गँगच्या सदस्यांनी केलेल्या गोळीबारादरम्यान तुर्की बनावटीची 'झिगाना' पिस्तूल जाम झाल्यामुळे अभिनेता टायगर श्रॉफ १८ ऑक्टोबरला एका संभाव्य प्राणघातक हल्ल्यातून थोडक्यात बचावला. अभिनेता त्याच्या बीएमडब्ल्यू कारमधून परतत असताना शूटर्सनी त्याच्यावर गोळीबार केला होता.
रेहान आणि फूल सिंह या शूटर्सनी टायगरच्या कारवर गोळीबार केला. रेहानकडे तुर्की बनावटीची झिगाना पिस्तूल होती, तर फूल सिंहकडे देशी कट्टा होता. सिंहने कट्ट्यातून ५ राऊंड फायर केले. पळून जात असताना रेहानने झिगाना पिस्तूलमधून आणखी दोन राऊंड झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही राऊंड फायर होऊ शकले नाहीत व काडतुसे फायर न होताच खाली पडली.