वडाळा येथे महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाइनमध्ये बिघाड; मुंबईत CNG चा पुरवठा थांबण्याची शक्यता छायाचित्र : विजय गोहिल
मुंबई

मुंबईत CNG चा पुरवठा थांबण्याची शक्यता; वडाळा येथे महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाइनमध्ये बिघाड

आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाइनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा गॅसपुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो, असा अलर्ट देण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाइनमध्ये बिघाड झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनला होणारा गॅसपुरवठा प्रभावित झाला आहे. याचा फटका मुंबईत गॅस पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून गॅस पुरवठा खंडित होऊ शकतो, असा अलर्ट देण्यात आला आहे.

आरसीएफ कंपाऊंडमधील गेलच्या मुख्य गॅस पाईपलाइनमध्ये बिघाड झाला असून वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनचा (सीजीएस) गॅस पुरवठा प्रभावित झाला आहे. मुंबईतील अनेक गॅस पंपावर सीएनजीचा तुटवडा निर्माण झाला आहे. दरम्यान घरगुती गॅस ग्राहकांना कोणत्याही अडचणीशिवाय गॅस पुरवठा करण्यात येईल, असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात येत आहे. गॅस प्रोसेसिंगच्या तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतील अनेक सीएनजी स्टेशन बंद राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मुंबई, ठाण्यातील सीएनजी पंप बंद?

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील अनेक सीएनजी पंप बंद होण्याची शक्यता आहे. सीएनजी पुरवठा स्थिर होईपर्यंत टॅक्सी, ऑटो, बेस्ट बस आणि इतर सार्वजनिक वाहतुकीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. “सीजीएस वडाळा येथील गॅसपुरवठा थांबल्यामुळे, मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक उपक्रमांसाठी समर्पित सीएनजी स्टेशनसह सीएनजी स्टेशन चालू शकत नाहीत. बाधित भागातील औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांना पर्यायी इंधन वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे,” असे महानगर गॅस लिमिटेडकडून सांगण्यात आले.

शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण केल्याने अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल; म्हणाले, "आम्ही कोणाला घाबरणारे...

"माझे काका....कमालीचे हिंदुप्रेमी होते, पण म्हणून..."; बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

Sheikh Hasina Sentenced To Death : मोठी बातमी! माजी पंतप्रधान शेख हसिना यांना मृत्यूदंडाची शिक्षा

सौदी अरेबियात भीषण अपघात; डिझेल टँकरला बस धडकल्याने ४२ भारतीयांचा होरपळून मृत्यू, हेल्पलाइन क्रमांक जारी

Navle Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात; कंटेनरची ४ ते ५ गाड्यांना धडक