मुंबई

धरणात केवळ २५ टक्के पाणीसाठा; मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकराना कडक उन्हाचे चटके बसत आहेत. या दरम्यान पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

Swapnil S

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईकराना कडक उन्हाचे चटके बसत आहेत. या दरम्यान पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये केवळ २५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी पाणीकपातीची टांगती तलवार मुंबईकरावर आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाण्याची पातळी अधिक असली तरी जलद होणाऱ्या बाष्पीभवनामुळे पाण्याच्या पातळीत घट होत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

अनेक ठिकाणी सुरू असलेली जलवाहिन्यांच्या गळतीच्या घटना, अनेक ठिकाणी सुरु असलेल्या पाण्याचा अमर्याद वापर यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. यावेळेस उन्हाचे तापमान अधिक असल्याने यंदा पाण्याची मागणी असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली.

मुंबईला ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्छ वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३,९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा केला जातो. या सातही धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर एवढी असून सद्यस्थितीत धरणांमध्ये केवळ ३ लाख ६५ हजार ८८३ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.

धरणातील सध्याचा पाणीसाठा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमध्ये मिळून एकूण २५.२८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा साठा १९.९९ टक्के होता. तर यावेळेस तुळशी तलावात सर्वाधिक ३७.३० टक्के पाणीसाठा असून तानसामध्ये २०.७३ इतका सर्वाधिक कमी पाणीसाठा उपलब्ध आहे.

तुळशी तलाव - ३७.३० टक्के

तानसा - २०.७३ टक्के

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video