मुंबईतील १४ विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात; तानसा जलवाहिनी बदलण्‍याचे काम हाती  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईतील १४ विभागांमध्ये १५ टक्के पाणीकपात; तानसा जलवाहिनी बदलण्‍याचे काम हाती

भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्‍यात आले आहे. या कारणाने बुधवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते गुरुवार ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात करण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई : भांडुप जलशुद्धीकरण केंद्राला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्‍यात आले आहे. या कारणाने बुधवारी ३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ते गुरुवार ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजेपर्यंत एकूण १४ प्रशासकीय विभागांमध्‍ये पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात करण्यात येणार आहे.

तानसा धरणातून भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रास पाणीपुरवठा करणारी २७५० मिलीमीटर व्यासाची तानसा जलवाहिनी बदलण्याचे काम बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतले आहे. जुनी जलवाहिनी काढून नवीन जलवाहिनी अंथरण्‍याकामी काही कामे प्रस्‍तावित आहेत. त्‍यासाठी साधारणतः २४ तासांचा कालावधी आवश्‍यक आहे. या कामकाजामुळे भांडूप येथील जलशुद्धीकरण केंद्रास होणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये अंदाजे १५ टक्‍के घट होणार आहे. ए, सी, डी, जी दक्षिण, जी उत्‍तर विभाग ; पश्चिम उपनगरातील एच पूर्व, एच पश्चिम, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्‍तर, आर दक्षिण, आर मध्य विभाग तसेच पूर्व उपनगरा‍तील एल आणि एस विभाग अशा एकूण १४ प्रशासकीय विभागांना होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १५ टक्‍के कपात केली जाणार आहे.

कोकणात राणे बंधू वाद टोकाला; निलेश राणेंच्या स्टींग ऑपरेशनवर नितेश राणेंची प्रतिक्रिया, म्हणाले, "हमाम में तो सब...

मुंबई, पुण्यासाठी खूशखबर! बदलापूर ते कर्जत तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेला मंजुरी; पुणे मेट्रोच्या 'फेज २'चा विस्तार होणार

Pune : हिंजवडीतील अंगणवाडी सेविकेचा प्रताप; २० चिमुकल्यांना कोंडून मीटिंगसाठी पसार, मुलांचे रडून हाल, धक्कादायक Video समोर

वयाच्या ५५ वर्षांनंतर व्हायचंय आईबाबा! सहाय्यक प्रजनन उपचारांतील वयाचे निर्बंध कमी करण्याची विनंती; निपुत्रिक दाम्पत्य हायकोर्टात

"आता फक्त आठवणी उरल्यात..."; धर्मेंद्र यांच्या निधनाच्या ३ दिवसांनी हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया; खास फोटोही केले शेअर