मुंबई

फुकट्या प्रवाशांवर ‘परे’ची कारवाई; एसी लोकलमधील फुकट्या प्रवाशांकडून २ कोटींपेक्षा जास्त दंड वसूल

उपनगरीय, मेल/एक्स्प्रेसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेमध्ये पश्चिम रेल्वेने १२१ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे.

Swapnil S

मुंबई : उपनगरीय, मेल/एक्स्प्रेसमधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरोधात पश्चिम रेल्वेने मोठी कारवाई केली आहे. एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या तिकीट तपासणी मोहिमेमध्ये पश्चिम रेल्वेने १२१ कोटींपेक्षा अधिक दंड वसूल केला आहे. तर एसी लोकलमधून फुकट प्रवास करणाऱ्यांकडून २ कोटींपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे.

पश्चिम रेल्वेवरील सर्व प्रामाणिक प्रवाशांना त्रासमुक्त, आरामदायी प्रवास करता यावा यासाठी मुंबई उपनगरीय लोकल, मेल/एक्स्प्रेस तसेच प्रवासी गाड्या आणि सुट्टीच्या विशेष गाड्यांमध्ये तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आली.

तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीत अनेक तपासणी मोहिमा राबविल्या. यामध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून १२१.६७ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही रक्कम गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा ५१ टक्के पेक्षा जास्त आहे. तसेच रेल्वे बोर्डाने निश्चित केलेल्या उद्दिष्टापेक्षा १४ टक्के पेक्षा जास्त आहे.

ऑक्टोबर महिन्यात ३.३९ लाख तिकीट नसलेल्या प्रवाशांना शोधून २४.२० कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली. ज्यामध्ये बुक न केलेल्या सामानाच्या केसेसचा समावेश आहे. तर एसी लोकल ट्रेनमध्ये अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी वारंवार अचानक तिकीट तपासणी मोहिमा राबविण्यात आल्या. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान जवळजवळ ६२ हजार अनधिकृत प्रवाशांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २.०२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. जे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा जवळजवळ ७६ टक्के जास्त आहे.

राज्यात आजपासून नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांना ब्रेक; वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

Thane Heatwave Alert : ठाणे जिल्ह्यात वाढणार उन्हाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा, वाचा महत्त्वाच्या सूचना

GMLR प्रकल्पातील बाधितांसाठी आनंदाची बातमी! महिनाअखेरीस कांजूरमार्ग येथे मिळणार नवी घरे

पुण्यातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीला इराण-इस्रायल युद्धाचा फटका! गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद, महापालिकेचा निर्णय

म्हाडा मुंबईची २५०० घरांची सोडत महिनाअखेरीस; पत्राचाळीतील घरे यंदाच्या लॉटरीतून वगळणार; एप्रिल महिन्यात प्राप्त अर्जांची लॉटरी