'वर्ककेशन'मध्ये मुंबईचा ग्लोबल डंका; 'वर्क फ्रॉम एनिवेअर'मुळे उत्पादकतेत ८० टक्के वाढ; कामासोबत पर्यटनासाठी मुंबईला जागतिक पसंती 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

'वर्ककेशन'मध्ये मुंबईचा ग्लोबल डंका; 'वर्क फ्रॉम एनिवेअर'मुळे उत्पादकतेत ८० टक्के वाढ; कामासोबत पर्यटनासाठी मुंबईला जागतिक पसंती

काम आणि पर्यटन यांची सांगड घालणाऱ्या जगभरातील सर्वोत्तम शहरांच्या ‘आयडब्ल्यूजी २०२६ वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स’मध्ये मुंबईने पहिल्यांदाच स्थान मिळवले आहे. या जागतिक निर्देशांकात समाविष्ट होणारे मुंबई हे एकमेव भारतीय शहर ठरले आहे.

प्रतिनिधी

स्वीटी भागवत/मुंबई

काम आणि पर्यटन यांची सांगड घालणाऱ्या जगभरातील सर्वोत्तम शहरांच्या ‘आयडब्ल्यूजी २०२६ वर्क फ्रॉम एनिवेअर इंडेक्स’मध्ये मुंबईने पहिल्यांदाच स्थान मिळवले आहे. या जागतिक निर्देशांकात समाविष्ट होणारे मुंबई हे एकमेव भारतीय शहर ठरले आहे.

‘आयडब्ल्यूजी’ने जाहीर केलेल्या या निर्देशांकाच्या चौथ्या आवृत्तीत मुंबईने ७७ गुण मिळवत लंडन आणि मियामीसारख्या प्रमुख जागतिक शहरांना मागे टाकले आहे. हा निर्देशांक हवामान, ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी, राहण्याची सोय, वाहतूक, संस्कृती, खाद्यसंस्कृती आणि फ्लेक्सिबल वर्कस्पेसची उपलब्धता या निकषांवर शहरांचे मूल्यमापन करतो. मुंबईने वाहतूक खर्च, फ्लेक्सिबल वर्कस्पेसची उपलब्धता, हवामान आणि निवास व्यवस्थेच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. मात्र, ब्रॉडबँडचा वेग व गुणवत्ता, स्थानिक कार्यक्रमांची उपलब्धता आणि हॅपीनेस इंडेक्स या निकषांवर मुंबईची कामगिरी तुलनेने कमी पडली आहे.

मुंबईतील फ्लेक्सिबल ऑफिस इन्फ्रास्ट्रक्चरचा होणारा विस्तार या निवडीमध्ये महत्त्वाचा ठरला आहे. ‘कुशमन अँड वेकफिल्ड’च्या ‘ग्लोबल ट्रेंड्स इन फ्लेक्सिबल ऑफिस २०२५’ अहवालानुसार, भारताने फ्लेक्सिबल वर्कस्पेस मॅच्युरिटी इंडेक्समध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिकेला मागे टाकले आहे. आशिया-पॅसिफिक क्षेत्रात भारत ही सर्वात मोठी फ्लेक्सिबल ऑफिस बाजारपेठ ठरली असून, २०२५ च्या दुसऱ्या तिमाहीत प्रमुख आठ शहरांमध्ये ७९.७ दशलक्ष चौरस फूट मोकळी जागा उपलब्ध होती. २०२६ मध्ये हा आकडा १०० दशलक्ष चौरस फूट ओलांडण्याचा अंदाज आहे. ‘आयडब्ल्यूजी’चे कार्यकारी अध्यक्ष आणि संस्थापक मार्क डिक्सन यांनी सांगितले की, “हायब्रिड वर्किंग आणि क्लाउड तंत्रज्ञानामुळे कर्मचाऱ्यांना जगातील कोणत्याही कोपऱ्यातून काम करण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे, ज्यामुळे दैनंदिन प्रवासाची गरज उरलेली नाही.”

बँकॉक ठरले जगात अव्वल

या जागतिक यादीत १०६.५ गुणांसह बँकॉक पहिल्या क्रमांकावर आहे. त्यापाठोपाठ टोकियो (९६.५) आणि बार्सिलोना (९५.५) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत. पोर्टो आणि व्हँकुव्हरने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळवले आहे, तर बुडापेस्ट, नेपल्स, मेडेलीन, लिस्बन आणि सियोल हे शहर पहिल्या १० मध्ये समाविष्ट आहेत.

५१ टक्के कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम एनिवेअर’ धोरण लागू

‘आयडब्ल्यूजी’ने ब्रिटन आणि अमेरिकेतील २,००० हायब्रिड कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ५१ टक्के कर्मचाऱ्यांच्या कंपन्यांमध्ये ‘वर्क फ्रॉम एनिवेअर’ धोरण लागू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे ९० टक्के कर्मचाऱ्यांचे वर्क-लाइफ बॅलन्स सुधारले असून ८० टक्के कर्मचाऱ्यांची उत्पादकता वाढल्याचे नोंदवले गेले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

कायदेशीर प्रक्रियेत कोणालाही खोडा घालण्यास मुभा नाही - उच्च न्यायालय

यूपीआयची आज दशकपूर्ती; दहा वर्षांत व्यवहारात १३ हजार पटीने वाढ

भारतात साखरेची कमतरता नाही; 'इस्मा'चा ठाम दावा

भारत आणि रशिया व्यापार सहकार्य वाढणार; परराष्ट्र मंत्री जयशंकर-पुतीन भेट

रूपाली चाकणकर बदनामी प्रकरणी गुन्हा दाखल