मुंबई

बुस्टर डोस घेण्याकडे मुंबईकरांची पाठ ;८ महिन्यांत फक्त १२३ जणांनी घेतली लसीची मात्रा

Swapnil S

मुंबई : कोरोना बाधित रुग्णांनी कोविशिल्ड व कोवॅक्सीन घेतल्यानंतर नाकावाटे बुस्टर डोस घेण्याकडे पाठ फिरवली आहे. २८ एप्रिल ते २३ डिसेंबरपर्यंत फक्त १२३ जणांनी बुस्टर डोस ( प्रिकाॅशन डोस) घेतल्याचे मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

मार्च २०२० मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि कोरोना बाधित रुग्णांची संख्येत झपाट्याने वाढ झाली. मुंबईकरांसह कोविड योद्धा ही बाधित झाले.  कोरोना बाधित रुग्णांवर उपयुक्त कोविशिल्ड व कोवॅक्सीन लस उपलब्ध झाली. बाधित रुग्णांना कोविशिल्ड व कोवॅक्सीन लसीची मात्रा देण्यात आल्याने मृत्यू दर रोखण्यात पालिकेच्या आरोग्य विभागाला यश आले. मात्र कोविशिल्ड व कोवॅक्सीन घेतल्यानंतर ही कोरोनाची लागण झालेल्यांना बुस्टर डोस अर्थात प्रिकाॅशन डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीच्या काळात बाधित रुग्णांनी कोविशिल्ड व कोवॅक्सीन घेतलेल्यांनी प्रिकाॅशन डोस घेतला. कोविशिल्ड व कोवॅक्सीन लसीचा डोस आजही दिला जात आहे. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने मुंबईकरांनी लसीची मात्रा घेण्याकडे पाठ फिरवली. यात फ्रंट लाईन वर्कर्स, हेल्थ वर्कर्ससह मुंबईकरांनी पाठ फिरवली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तरी कोरोनाचा संपूर्ण नायनाट न झाल्याने एप्रिल २०२३ पासून पुन्हा एकदा नाकावाटे बुस्टर डोस अर्थात प्रिकाॅशन डोस देण्यास सुरुवात झाली. मात्र एप्रिल ते २३ डिसेंबरपर्यंत फक्त १२३ जणांनी प्रिकाॅशन डोसची मात्रा घेतल्याचे आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीतून समोर आले आहे.

आम्ही भाजप मुख्यालयात येतो, अटक कराच! अरविंद केजरीवाल यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आ‌व्हान

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

मोदींच्या बुलडोझरच्या वक्तव्याला इंडिया आघाडीचा आक्षेप; निवडणूक आयोगाने मोदींवर कारवाई करावी - खर्गे

क्रॉफर्ड मार्केटने टाकली कात, लवकरच मुंबईकरांच्या सेवेत

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार