मुंबई

मुंबईकरांना दिलासा, पिसे केंद्रावर आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा पूर्ववत; १५ टक्के पाणी कपात रद्द

Swapnil S

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे जलउदंचन केंद्रात ट्रान्सफार्मरला लागलेल्या आगीमुळे बाधित झालेली यंत्रणा पूर्ववत झाली आहे. सद्यस्थितीत तीन ट्रान्सफार्मर सुरू होऊन त्या आधारे सर्व २० पंप सुरू करण्यात आले आहेत. मंगळवारी तिसऱ्या ट्रान्सफार्मरवर आधारित पंपदेखील पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहेत. त्यामुळे संपूर्ण मुंबई शहर, पश्चिम उपनगरे, पूर्व उपनगरे तसेच ठाणे शहर, भिवंडी व नगर बाह्य विभाग येथील मुंबई २ व ३ जलवाहिन्यांतून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील १५ टक्के पाणी कपात आजपासून मागे घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पिसे येथील जलउदंचन केंद्राच्या ट्रान्सफार्मरला २६ फेब्रुवारी रोजी आग लागल्याने यंत्रणा बाधित झाली होती. त्यामुळे मुंबई महानगरात १५ टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. त्यानंतर दुरूस्तीचे काम तातडीने सुरू करून टप्प्याटप्प्याने ट्रान्सफॉर्मर आणि त्यावर आधारीत पंप सुरू करण्यात आले. दुरूस्तीसाठी परिरक्षणाअंतर्गत असलेला तिसरा ट्रान्सफॉर्मर नुकताच सुरू झाला असून त्यावर आधारित पाच पंप चालू झाले आहेत. सद्यस्थितीत पिसे केंद्रातील सर्व म्हणजे २० पैकी २० पंप कार्यरत झाले आहेत. त्याआधारे पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येत आहे. तसेच पिसे उदंचन केंद्रासह पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात आले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस