मुंबई

मनपाच्या निवडणुका २२७ प्रभागानुसार; मुंबईतील प्रभाग रचनेचे काम लवकर पूर्ण करण्याच्या नगरविकास विभागाला सूचना

मुंबई महापालिकेच्या हद्दीत २२७ प्रभाग असून २२७ प्रभागानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. प्रभाग रचनेचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून होत असल्याने महिनाभरात प्रभाग रचनेचे काम पूर्ण करा, अशी सूचना शासनाला करण्यात आली आहे. सदस्य संख्या निश्चित करणे, प्रभाग रचना, आरक्षण, मतदारयादी व प्रत्यक्ष निवडणूक अशा चार टप्प्यांत निवडणूक प्रक्रियेचे काम वेगात सुरू आहे.

गिरीश चित्रे

मुंबई महापालिकेच्या हद्दीत २२७ प्रभाग असून २२७ प्रभागानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुका पार पडणार आहेत. प्रभाग रचनेचे काम राज्य शासनाच्या माध्यमातून होत असल्याने महिनाभरात प्रभाग रचनेचे काम पूर्ण करा, अशी सूचना शासनाला करण्यात आली आहे. सदस्य संख्या निश्चित करणे, प्रभाग रचना, आरक्षण, मतदारयादी व प्रत्यक्ष निवडणूक अशा चार टप्प्यांत निवडणूक प्रक्रियेचे काम वेगात सुरू आहे.

मतदानाच्या दिवशी गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, २० ऑक्टोबरपासून दिवाळीला सुरुवात होत असून दिवाळी आधीच निवडणुकीचा बार उडणार आहे.

७ मार्च २०२२ रोजी नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ८ मार्चपासून मुंबई महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. राज्यात सद्यस्थितीत २९ महानगरपालिकेत प्रशासकीय राज्य आहे. यात जालना व इचलकरंजी या दोन महानगरपालिकांचा समावेश आहे. मुंबई महापालिकेसह अनेक महानगरपालिकेत तीन वर्षांहून अधिक काळापासून प्रशासक कार्यरत आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निर्णय देत चार महिन्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तब्बल तीन वर्षांनंतर मुंबई महापालिकेसह राज्यातील महानगरपालिका, नगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगही निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडणार असल्या तरी संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असते ते मुंबई महापालिकेकडे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांसह निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या कामासाठी कंबर कसली आहे.

चार टप्प्यांत निवडणूक कामे सुरू

१) सदस्य संख्या निश्चित करणे, प्रभाग रचना

२) आरक्षण

३) मतदारयादी

४) प्रत्यक्ष निवडणूक

वॉर्ड आरक्षण लवकरच ठरणार

संख्या किंवा टक्केवारी निश्चित करणे, त्यानंतर कुठल्या वॉर्डात आरक्षण हे निश्चित होणार आहे.

पुन्हा लॉटरी

२०१२, २०१७ व २०२२ मध्ये नेमके काय आरक्षण होते, यंदा कुठले आरक्षण असले पाहिजे त्यानुसार आरक्षण ठरणार आहे. त्यामुळे यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा लॉटरी काढण्यात येणार आहे.

महानगरपालिका -

  • एकूण महानगरपालिका - २९ (जालना व इचलकरंजी नवनिर्मित)

  • प्रशासक असलेल्या महानगरपालिका - २९

नगरपरिषदा

  • एकूण नगरपरिषदा - २४८

  • एकूण नगरपंचायती - १४७

  • प्रशासक असलेल्या व नवनिर्मित नगरपंचायती - ४२

एकूण मतदार - १० कोटी

विधानसभा निवडणुकीत किंवा अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली, त्यानुसार १० कोटी मतदार निवडणुकीत मतदान करतील.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली