मुंबई

पालिका कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात साजरी होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केल्याने मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले

प्रतिनिधी

मुंबई महानगरपालिका कर्मचाऱ्यांना यंदा दिवाळी बोनस देण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात पालिकेतील विविध कर्मचारी संघटनांची बैठक गुरुवारी पार पडली. या बैठकीत २२ हजार ५०० रुपये बोनस देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे पालिकेतील एक लाख कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात साजरी होणार आहे. मात्र, बोनसपोटी पालिकेवर २५० कोटींचा बोजा पडणार आहे.

मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात चांगले काम केल्याने मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश आले. यासाठी २०२१ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोनसच्या रकमेत भरघोस वाढ करून २० हजार इतका बोनस दिला होता; मात्र यंदा पालिका कर्मचाऱ्यांना २५ हजार रुपये बोनस द्यावा, अशी मागणी पालिका कर्मचाऱ्यांच्या युनियन आणि कृती समितीकडून करण्यात आली होती. पालिका कर्मचारी संघटना कृती समिती आणि महापालिका आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्यात बुधवारी बैठक झाली. या बैठकीत आयुक्तांनी २० हजार रुपये बोनस देण्यासाठी सकारात्मकता दाखवली. बोनसमध्ये वाढ करून हवी असल्यास मुख्यमंत्र्यांकडे बैठक घ्यावी, अशी सूचना आयुक्तांनी केली होती.

त्यानुसार गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीस खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इक्बाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, माजी आमदार किरण पावसकर, महापालिकेतील विविध कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, संदीप देशपांडे, शशांक राव, संतोष धुरी यांच्यासह पालिकेच्या विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते. या बैठकीत २२ हजार ५०० रुपये बोनस देण्यास मान्यता देण्यात आली.

मुख्यमंत्री व पालिका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचे कामगार संघटनांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांना बोनस वाढवून दिल्याबद्दल आम्ही समाधानी असल्याचे कामगार नेते बाबा कदम, अॅड. महाबळ शेट्टी, अॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल