मुंबई

प्रेमप्रकरणातून तरुणीची केली हत्या

एका २० वर्षांच्या हल्लेखोर तरुणाला देवनार पोलिसांनी अटक केली

प्रतिनिधी

भररस्त्यात एका १८ वर्षांच्या तरुणीची तिच्याच परिचित आरोपी तरुणाने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी गोवंडीतील देवनार परिसरात घडली. फौजिया खान असे या हत्या झालेल्या तरुणीचे नाव असून तिच्या हत्येप्रकरणी साहिल नावाच्या एका २० वर्षांच्या हल्लेखोर तरुणाला देवनार पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून हा प्रकार घडल्याचा संशय व्यक्त होत आहे. दरम्यान आरोपीची चौकशी सुरू असून चौकशीनंतरच या घटनेमागील कारणाचा खुलासा होईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांनी सांगितले.

फौजिया आणि साहिल हे दोघेही एकाच परिसरात राहत असून एकमेकांच्या परिचित आहेत. शुक्रवारी दुपारी ती गोवंडीतील झाकीर हुसैन नगर परिसरातून जात होती. यावेळी तिथे साहिल आला आणि त्यांच्यात कुठल्या तरी विषयांवर वाद सुरू झाला होता. यावेळी रागाच्या भरात साहिलने त्याच्याकडील तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर वार केले. त्यात ती जागीच कोसळली होती. हल्ल्यानंतर साहिल हा पळून गेला होता. ही माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवी आडाणे यांच्यासह देवनार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. रक्तबंबाळ झालेल्या फौजियाला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार सुरु असतानाच तिचा सायंकाळी मृत्यू झाला. या हल्ल्यामागे साहिलचे नाव समोर आले होते. त्यामुळे पळून गेलेल्या साहिलला काही तासांत गोवंडी परिसरातून पोलिसांनी अटक केली. प्राथमिक तपासात साहिलचे फौजियावर प्रेम होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली