मुंबई

मुस्लिमांच्या विवाह नोंदणीचा मार्ग मोकळा! एकापेक्षा अधिक विवाहांच्या नोंदणीला कायद्याचा अडसर नाही; न्यायालयाचा निर्वाळा

शरीयतनुसार मुस्लीम पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी आहे. त्यामुळे मुस्लीम पुरुष विवाह नोंदणी कायद्यानुसार एकाहून अधिक लग्नांची नोंदणी करू शकतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना दिला.

Swapnil S

मुंबई : शरीयतनुसार मुस्लीम पुरुषांना एकापेक्षा अधिक विवाह करण्याची परवानगी आहे. त्यामुळे मुस्लीम पुरुष विवाह नोंदणी कायद्यानुसार एकाहून अधिक लग्नांची नोंदणी करू शकतात, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने यासंबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना दिला. एका मुस्लीम याचिकाकर्त्याने त्याच्या तिसऱ्या विवाहाच्या नोंदणीसाठी केलेला अर्ज विवाह नोंदणी कार्यालयाने रद्दबातल ठरवला होता. यावेळी याचिकाकर्त्याच्या विवाह नोंदणी अर्जावर निर्णय घेण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.

याचिकाकर्त्याने गेल्या वर्षी फेबुवारीत विवाहाची नोंदणी करण्यासाठी विवाह नोंदणी कार्यालयात अर्ज केला होता. याचिकाकर्त्याने एका अल्जेरियन महिलेशी केलेला विवाह त्याचा तिसरा विवाह होता. महाराष्ट्र विवाह नियामक संस्था आणि महाराष्ट्र विवाह नोंदणी कायद्यांतर्गत ‘विवाह’ म्हणजे फक्त एकच लग्न असा अर्थ मानला जातो. याच सबबीवर नोंदणी कार्यालयाने विवाह नोंदणीला नकार देत याचिकाकर्त्याचा अर्ज रद्दबातल ठरवला होता. नोंदणी कार्यालयाला आपल्या विवाहाची नोंदणी करण्याचे निर्देश द्यावेत यासाठी याचिकाकर्त्याने न्यायालयात याचिका दाखल केली.

न्यायमूर्ती बी पी कोलाबावाला आणि न्या. सोमशेखर सुदरेशन यांच्या खंडपीठाने म्हटले की सध्याच्या विवाह नोंदणी कायद्यात मुस्लिमांना एकापेक्षा अधिक लग्नांची नोंदणी करता येणार नाही असे म्हटल्याचे कुठेच आढळून येत नाही. शरीयतनुसार मुस्लिमांना चार पत्नीसोबत विवाह करून राहण्याची परवानगी आहे.

याचिकाकर्त्याच्या अर्जावर १० दिवसांत निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

‘मविआ’चे समान जागावाटप; काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट प्रत्येकी ८५ जागा लढवणार, १८ जागा मित्रपक्षांना, १५ जागांबाबत उत्सुकता

ठाकरेंच्या शिवसेनेकडून नवे चेहरे; पहिल्या यादीत ६५ उमेदवारांच्या नावांची घोषणा, मुंबईतील १३ उमेदवारही जाहीर

अजितदादांच्या यादीत चारच लाडक्या बहिणी; राष्ट्रवादी काँग्रेसचे ३८ उमेदवार जाहीर

शिंदेंचाही घराणेशाहीवर भरवसा; ४५ उमेदवार जाहीर, माहीममध्ये अमित ठाकरे विरुद्ध सदा सरवणकर!

भरगच्च गर्दीत चढणं जीवावर बेतलं; कर्जत लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू, अंबरनाथ-बदलापूर स्थानकांदरम्यान घटना