PM
मुंबई

नायर रुग्णालय पूरमुक्त होणार ;पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनची क्षमता वाढणार

Swapnil S

मुंबई : मराठा मंदिर, बेलासिस रोड जंक्शन व नायर रुग्णालय परिसरात असलेल्या पाणी वाहून नेणाऱ्या ड्रेनेज लेनच्या क्षमतेत वाढ करण्यात येणार आहे. याठिकाणी आरसीसी ड्रेनचे बांधकाम करण्यात येणार असून, पावसाळा वगळून पुढील १८ महिन्यात काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. यासाठी मुंबई महापालिका तब्बल १६ कोटी ८७ लाख २३ हजार ६५६ रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे २०२५ च्या पावसाळ्यापासून नायर रुग्णालय पूरमुक्त होईल, असा विश्वास पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईतील सखल भागात पाणी साचते आणि मुंबई ठप्प होते. फ्लडिंग पाईट मध्ये नायर रुग्णालय परिसरात दरवर्षी १ ते ४ फूट पाणी तुंबते. यामुळे नायर रुग्णालयातील कामकाजावर काहीसा परिणाम होतो. याठिकाणी असलेल्या ड्रेनेज लेनचे आकारमान लहान असल्याने दरवर्षी पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून पालिकेच्या 'ई' वॉर्डातील डॉ. आनंदराव नायर मार्गावरील मराठा मंदिर सिनेमापासून बेलासिस रोड जंक्शनपर्यंत ३.०० मी. x २.४० मी. आकारमानाच्या आणि वॉकहार्ड हॉस्पिटलपासून नायर हॉस्पिटलपर्यंत २.७० मी. x २.१० मी. आकारमानाच्या आरसीसी बॉक्स ड्रेनचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, पात्र कंत्राटदाराला पावसाळा वगळून पुढील १८ महिन्यांत काम पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे.

९ जून २०२१ व २०२२ मध्ये बरसलेल्या पावसामुळे नायर रुग्णालय गेट क्रमांक ४ व परिसर जलमय झाला. त्यामुळे रुग्णालयातील ओपीडी सेवा कोलमडली होती. रुग्ण व रुग्णालयातील स्टाफची तारांबळ उडाली होती. त्यामुळे नायर रुग्णालय परिसर पूरमुक्त करण्यासाठी ड्रेनेज लेनच्या क्षमतेत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस