Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Nalasopara : लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार; आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचाही आरोप

नालासोपाऱ्यात लग्नाचं आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचे दावे पुढे आले असून, पोलिस तपास सुरू आहे.

Mayuri Gawade

नालासोपारा : लग्नाचं आश्वासन देऊन एका तरुणीवर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार नालासोपाऱ्यात समोर आला आहे. पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आणखी ७० ते ८० महिलांची फसवणूक आणि लैंगिक शोषण झाल्याचे आरोपही पुढे आले आहेत.

जिममध्ये झाली ओळख, लग्नाचं आमिष अन्...

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, स्थानिक जिममध्ये आरोपी त्याच्या मित्रांसोबत असताना तिची त्याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढली. आरोपीने विविध आश्वासनं देत तिचा विश्वास संपादन केला. पुढे लग्नाचं आमिष दाखवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

आणखी ७० ते ८० महिलांच्या शोषणाचा दावा

'फ्री प्रेस जर्नल'च्या वृत्तानुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपीचं नाव आरिफ अबू शेख असल्याचं समोर आलं आहे. त्याने अशाच प्रकारे सुमारे ७० ते ८० हिंदू महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. तसंच, संबंधित महिलांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ काढून त्यांचा गैरवापर केल्याचाही आरोप आहे.

आरोपीसह आई आणि नातेवाइकाविरोधात गुन्हा

पीडित तरुणीच्या तक्रारीवरून नालासोपारा पोलिस ठाण्यात मुख्य आरोपी आरिफ अबू शेख, त्याची आई रुखसाना आणि नातेवाईक साहिल खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

(इंग्रजीत बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Punjab : फेसबुक लाइव्ह सुरू असतानाच गोळीबार; ड्रग्सविरोधी कार्यकर्ते परविंदर झोटा यांची हत्या, Video

CJP Protest : जंतर-मंतरवर प्रवेश करताच दिल्ली पोलिसांची कारवाई; सौरव दास, आशुतोष रांकांसह अजिंक्य शिंदे ताब्यात

Mumbai : माटुंगा रेल्वेच्या २२ एकर जागेवर धारावी पुनर्वसन घरांचे भूमिपूजन

Mumbai : कारवाईआधी राज्य सरकारशी चर्चा करा! झोपड्यांबाबत खासदारांची विभागीय बैठक; रेल्वेला सूचना

Mumbai : नाहूरमध्ये ४८ व्या मजल्यावरून कोसळून दोन कामगारांचा मृत्यू; केबल तुटल्याने भीषण दुर्घटना