मुंबई

नरेश गोयल यांनी परदेशी बँक खात्यातून पैसे फिरवले

नवशक्ती Web Desk

मुंबई : जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांची परदेशात शेकडो बँक खाती होती आणि त्यांनी आपल्या कुटुंबाच्या फायद्यासाठी तयार केलेल्या ट्रस्टच्या पैशाची उधळपट्टी केली होती, असा दावा ‘ईडी’ने दाखल केलेल्या गुन्ह्यात केला आहे. त्यांच्या परदेशातील बँक खात्यांचा तपास सुरू असून ट्रस्टमध्ये त्यांची मालमत्ता व निधी आहे, असे ‘ईडी’ने सांगितले.

गोयल यांनी ५७१६.३४ कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे ‘ईडी’ने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. गोयल यांनी आपल्या वैयक्तिक फायदा व कुटुंबासाठी काळा पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप ‘ईडी’ने केला. १९९१ पासून गोयल अनिवासी भारतीय होते. त्यांची परदेशात अनेक बँक खाती होती. गोयल यांनी त्यांची गुंतवणूक, बँक खात्याचा तपशील, मालमत्ता याबाबत एकही कागदपत्र सादर केले नाही. अनेक वर्षे तोट्यात असलेल्या जेट एअरवेज लिमिटेडचा पैसा गोयल यांनी बिनधास्तपणे फिरवला. गोयल यांनी परदेशात ट्रस्ट स्थापन केले. तसेच परदेशात महागड्या मालमत्ता ताब्यात घेतल्या.

त्यांच्या ट्रस्टबाबत आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारले, मात्र त्यांनी एकाही प्रश्नाचे उत्तर दिले नाही, असा दावा ‘ईडी’ने केला. माझे सीए दिलीप ठक्कर असून ट्रस्टची सर्व माहिती त्यांनाच असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या ट्रस्टचे व्यवस्थापन एच. डी. गर्डी यांच्याकडून होत असल्याचे सांगितले. गोयल यांच्या परदेशातील सर्व मालमत्तांचे पॉवर ऑफ ॲॅटर्नी गर्डी असल्याचे सांगितले.

गोयल यांनी ‘पॅन हॉरिझन ट्रस्ट’, ‘न्यू हॉरिझन ट्रस्ट’ व ‘नाइटब्रीज हॉरिझन ट्रस्ट’चा सर्वात मोठा फायदा नरेश गोयल, त्यांच्या पत्नी अनिता गोयल, त्यांचे पुत्र निवान गोयल व मुलगी नम्रता गोयल यांना मिळाला. या ट्रस्टवर हाँगकाँग बँक ट्रस्टी कंपनी लिमिटेड हे विश्वस्त आहेत. तसेच त्यानंतर त्यांचे विश्वस्तपद आयक्यूईक्यू ट्रस्टशीप कंपनीकडे सुपूर्द करण्यात आले, असे ‘ईडी’ने सांगितले.

गोयल व त्यांच्या कुटुंबीयांच्या लंडनमध्ये तीन मालमत्ता आहेत. त्या मालमत्ता ट्रस्टच्या वतीने घेण्यात आलेल्या आहेत. गोयल यांचा मुलगा निवान याला ४० लाख रुपये त्याच्या व्यवसायासाठी या ट्रस्टमधून देण्यात आले.

१९९६ मध्ये गोयल यांनी भारतात कुटुंबाच्या नावाने ट्रस्ट स्थापन केला. नोव्हेंबर २०२२ पर्यंत नरेश गोयल व त्यांच्या पत्नी या ट्रस्टवर विश्वस्त म्हणून काम करत होते. त्यानंतर मेरिबेल कस्टोडियन सर्व्हिस प्रा. या कंपनीला नवीन विश्वस्त म्हणून नेमण्यात आले. या ट्रस्टच्या बँक खात्यात ४०.९६ लाख रुपये होते. मारिबेल कस्टोडियन स. प्रा. लिमिटेडचे ठक्कर हे संचालक होते. त्यांनी आपल्या जबाबात सांगितले की, २०१९ च्या मध्यापर्यंत गोयल यांनी आपण ओळखत नव्हतो, असे सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस