मुंबई

नवाब मलिक कोणत्या गटात जाणार?

प्रतिनिधी

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याच्या मुंबईतील मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात असणारे राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री नबाव मलिक यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. नवाब मलिक तब्बल १ वर्ष ५ महिन्यांनंतर जेलबाहेर येणार आहेत. प्रकृतीच्या कारणास्तव पुढील २ महिन्यांसाठी मलिकांना जामीन मिळाला आहे. नवाब मलिक हे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या अतिशय जवळचे मानले जातात, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसमधील बदललेल्या पार्श्वभूमीवर नवाब मलिक हे शरद पवारांसोबतच राहतात की अजितदादा गटाची साथ धरतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, नवाब मलिक यांना जामीन मंजूर केल्यानंतर मंत्रालयसमोर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस