मुंबई

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक खाजगी रुग्णालयात दाखल

प्रतिनिधी

मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली गेल्या दीड महिन्यांपासून तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चालली आहे. नवाब मलिक यांना अखेरीस खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर किडनी आणि इतर आजारांवर उपचार होणार आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार कुर्ल्यातील क्रीटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आर्थिक गैरव्यवहार आणि मनी लॅांड्रिंग प्रकरणी इडीच्या अटकेत असलेले मंत्री नवाब मलिक यांना आत मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ईडी न्यायालयाने काही दिवसांपूर्वी अंशातः दिलासा दिला होता. त्यांना असलेल्या आजारावर ते खाजगी रुग्णालयात उपाचार करु शकतात अशी परवानगी काही दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष ईडी न्यायालयाने दिली होती.

न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार दुपारी १२ वाजता नवाब मलिक यांना ऑर्थर रोड कारागृहातून कुर्ला मधील क्रीटी केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . किडनी आणि उच्च रक्तदाब, पायाला सतत येणारी सुज यासोबत बेडिएट्रिक सर्जरी करण्यात येणार आहे. उपचाराचा आणि पोलीस बंदोबस्ताचा खर्च नवाब मलिक यांनी स्वतः करावा, अशी अट ठेवण्यात आली आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत