Resident Doctors Strike
Resident Doctors Strike 
मुंबई

निवासी डॉक्टरांच्या राज्यव्यापी संपाला सुरुवात, डॉक्टर मागण्यांवर ठाम

Naresh Shende

मुंबई : निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या 'मार्ड'ने आज गुरुवारी सायंकाळी पाच वाजल्यापसून राज्यव्यापी संपाला सुरुवात केलीय. या संपात जवळपास ९०० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत. त्यामुळे जेजे रुग्णालयात अनिश्चित काळापर्यंत रुग्णांवर उपचार केले जाणार नाहीत. या संपात त्वचाविज्ञान विभागाचे डॉक्टरही सहभागी झाले आहेत. विभागीय प्रमुखाला काढून टाकण्याच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसांपासून ते संपावर आहेत.

सरकारकडून मागण्या पूर्ण होत नसून फक्त आश्वासनेच मिळत असल्याने आता निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने गुरुवारी सायंकाळी ५ वाजल्यापासून राज्यव्यापी संप सुरु केला आहे. मात्र या संपामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालातील निवासी डॉक्टर सहभागी होणार नसल्याचे बीएमसी मार्डने स्पष्ट केले आहे.

राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयामधील डॉक्टरांची संख्या वाढत आहे. मात्र त्या तुलनेत वसतिगृहांच्या संख्येत वाढ करण्यात आलेली नाही, तसेच वसतिगृहाची दूरवस्था झाली असून तेथे सोयीसुविधांचा अभाव आहे. यामुळे वसतिगृहांची तातडीने दुरुस्ती करावी आणि बांधकामासाठी निधी उपलब्ध करावा. तसेच निवासी डॉक्टरांचे प्रलंबित मानधन तत्काळ द्यावे, त्यांना विद्यावेतन वेळेवर द्यावे, विद्यावेतनामध्ये १० हजार रुपयांपर्यंत वाढ करावी आदी मागणीसाठी केंद्रीय मार्डने ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारण्याचा इशारा दिला होता.

का वाढेना मतदानाचा टक्का?

जपायला हवा, दाभोलकरांचा वारसा

"काँग्रेसमुळं देशाची पाच दशके वाया गेली..."शिवाजी पार्क सभेतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

"पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर...", राज ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींची पंडित नेहरूंशी तुलना

पंतप्रधान नरेंद्र मोदी सभास्थळी पोहोचले, शिवाजी पार्कात काय बोलणार मोदी?