मुंबई

Mumbai : नवजात अर्भकाचा मृतदेह विमानतळाच्या कचराकुंडीत

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वच्छतागृहातील कचराकुंडीत नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची माहिती अधिकाऱ्याने बुधवारी दिली.

Swapnil S

मुंबई : मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या स्वच्छतागृहातील कचराकुंडीत नवजात अर्भकाचा मृतदेह आढळल्याची माहिती अधिकाऱ्याने बुधवारी दिली.

पोलिसांनी विमानतळात एक दिवसाचे बाळ कचरा कुंडीत टाकणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. हे विमानतळ शहराच्या सहार भागात असलेल्या टी-२ टर्मिनलमध्ये स्थित आहे.

अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास विमानतळ सुरक्षा दलाला स्वच्छतागृहाच्या कचराकुंडीत नवजात अर्भक आढळल्याची माहिती मिळाली. बाळाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेज तपासून पुरावे गोळा केले जात आहेत.

ग्रँड मुफ्तींच्या प्रयत्नांना यश; निमिषा प्रियाला मोठा दिलासा, येमेन सरकारकडून फाशी तुर्तास स्थगित

पती-पत्नीचा 'सिक्रेट' कॉल पुरावा म्हणून ग्राह्य: घटस्फोट प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल

वडापाव, समोसा, कचोरी म्हणजे लठ्ठपणाला आमंत्रण; आरोग्य खाते सर्वत्र फलक लावणार

Mumbai : मढमधील बेकायदा बंगल्यांच्या बांधकामांसाठी शेकडो बनावट नकाशे : ४ बड्या अधिकाऱ्यांना कोर्टाचा दणका

Mumbai : कांदिवली, मालाड विभागातील 'हे' ७ पूल धोकादायक; लवकरच होणार पुनर्बांधणी