मुंबई

पालिका शाळांत आता रात्र अभ्यासिका ; कोल डोंगरीत पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन

विशेष म्हणजे मुंबईत ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न केला जाणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.

प्रतिनिधी

मुंबई : जागे अभावी पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आता इतरत्र जागा शोधण्याची गरज नाही. पालिका शाळांत आता रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आली आहे. अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे सुरू झाली आहे. शुक्रवारपासून पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत ही रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. पालक मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या अभ्यासिकेचे उद्घाटन झाले. विशेष म्हणजे मुंबईत ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात, यासाठी आम्ही प्रयत्न केला जाणार असल्याचे लोढा यांनी सांगितले.

पालिका शाळांत शिकणाऱ्या मुलांना पुरेसा जागा व इतर आवश्यक सुविधा नसल्याने अभ्यास करण्यासाठी अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन बृहन्मुंबई महापालिकेच्या शालेय इमारतींमध्ये सायंकाळच्या वेळेत रात्र अभ्यासिका सुरू करण्याचे निर्देश मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महापालिकेच्या शालेय शिक्षण विभागाला दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. अंधेरी पूर्व येथील कोल डोंगरी परिसरातील नित्यानंद मार्ग पब्लिक स्कूल येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत रात्र अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. पालकमंत्री लोढा यांनी या रात्र अभ्यासिकेचे उद्घाटन केले. मुंबईमध्ये रात्र अभ्यासिकेची नितांत गरज आहे. आपल्या शहरात अनेक विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जागा नाही, आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध नाहीत, त्यामुळे इच्छा असताना सुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यास, प्रगती करण्यास अडथळे निर्माण होतात. या अभ्यासिकेमुळे मुलांचे अनेक प्रश्न सुटणार आहेत. हे वर्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष आहे त्यानिमित्ताने लवकरच आपल्या शहरात ३५० रात्र अभ्यासिका सुरू व्हाव्यात यासाठी आम्ही प्रयत्न करू असे लोढा यांनी यावेळी बोलताना सांगितले. यापुढे प्रत्येक वॉर्डमध्ये तशी सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्याचा आमचा मानस असल्याचे ते म्हणाले. यावेळी आमदार पराग आळवणी, माजी नगरसेवक अभिजित सावंत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार

मुंबई महापालिका शाळेत शिकणाऱ्या तसेच परिसरातील खासगी शाळेत शिक्षण घेणाऱ्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमात प्रवेश घेता येणार आहे. उत्कर्ष शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने पालिकेच्या शाळांमध्ये तळमजल्यावर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोली उपलब्ध असणार आहे. या इमारतीतच ६ ते ८ या वेळात रात्र अभ्यासिका सुरू करण्यात येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून संमती पत्र, तसेच विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती आवश्यक असणार आहे. हा उपक्रम टप्प्याटप्प्याने पालिकेच्या सर्व शाळांमध्ये सुरू होणार आहे.

गुजरातेत हिंदी सक्ती नसेल, तर ती महाराष्ट्रात कशासाठी? खासदार सुप्रिया सुळे यांचा संतप्त सवाल

आज विजयी मेळावा; उद्धव-राज ठाकरे वरळीत एकाच मंचावर येणार

‘जय गुजरात’मुळे वादंग; अमित शहांपुढे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या घोषणेमुळे विरोधक संतप्त

हायकोर्टाची सुनावणी सोमवारपासून लाईव्ह; सुरुवातीला पाच न्यायमूर्तींचा समावेश

मथुरेची शाही ईदगाह मशीद वादग्रस्त संरचना नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका फेटाळली