मुंबई

भर अधिवेशनात नितेश राणेंनी संजय राऊतांना धमकावलं; म्हणाले, "१० मिनिटांसाठी..."

प्रतिनिधी

आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाबद्दल केलेल्या वादग्रस्त व्यक्तव्याचा मुद्दा चांगलाच गाजला. सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनीही त्यांनी केलेल्या विधानाचा निषेध केला. मात्र, यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी तर संजय राऊतांना धमकीच दिली. ते सभागृहात म्हणाले की, "१० मिनिटे त्याचे संरक्षण काढा, तो परत दिसणार नाही," असे धमकावले.

भाजप आमदार नितेश राणे म्हणाले की, "रोज सकाळी संजय राऊतांचे ऐकावे लागते. खरंच महाराष्ट्राला याची गरज आहे का? आपण त्यांचे काय घेऊन खाल्ले आहे. राऊतांचा आणि शिवसेनेचा काय संबंध आहे? ते 'सामना'त येण्याआधी त्यांचे सगळे लेख शिवसेनेच्या विरोधात होते. तेव्हा त्यांची एवढी हिंमत झालेली की, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात लिहिले, शिवसेनेच्या विरोधात लिहिले. त्यांना दिलेले संरक्षण काढा. ते पोलिसांचे संरक्षण घेऊन फिरतात, सरकारने दिलेले संरक्षण आहे ते. १० मिनिटे ते संरक्षण काढायला सांगा, उद्या सकाळी ते परत दिसणार नाहीत, एवढा शब्द देतो."

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस